March Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्च २०२४ मध्ये काही रोमांचक बदल दिसून येणार. हे बदल ग्रह राशी बदलल्यामुळे दिसू शकतात. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे १२ राशींवर याचा परिणाम होणार आहे पण काही राशींवर मार्च महिन्यात लक्ष्मीची कृपा दिसून येईल. या राशीच्या लोकांना सुख, समाधान लाभेल. त्या राशी कोणत्या, चला तर जाणून घेऊ या.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बुध ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे याचा परिणाम इतर राशींवर दिसून येईल. काही राशींची अध्यात्मिक वाढ होऊ शकते. त्यानंतर १० मार्च ला शुक्र ग्रह मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यामुळे कुंभ राशीसह इतर राशींना समाजात मान सन्मान मिळेल.
१४ मार्चला सूर्य ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे ज्यामुळे काही राशींच्या आयुष्यात नवी सुरूवात होईल. २१ मार्चला मंगळ ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे मिथुनसह अन्य राशींना याचा फायदा होईल. या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्यानंतर २८ मार्च ला बुध ग्रह मीन राशीतून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे मेष राशीसह अन्य काही राशींना शुभ फळ मिळतील.

Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
Shani Nakshatra Parivartan
पुढील ६ महिने ‘या’ राशींचे नशीब अचानक पलटणार? ३० वर्षानंतर शनिदेवाने नक्षत्र बदल केल्याने मिळू शकतो चांगला पैसा
Sagittarius April Horoscope
Sagittarius : धनु राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात घ्यावी विशेष काळजी; कशी असेल त्यांची आर्थिक स्थिती अन् लव्ह रिलेशन? जाणून घ्या
shani surya yuti in kumbh rashi ended
शनि-सूर्याची युती संपली; या राशींचे लोक होतील मालामाल, मिळणार अमाप पैसै

हेही वाचा : ग्रहांचा राजा सूर्य करणार मेष राशीत प्रवेश! ‘या’ राशींना मिळेल नशिबाची साथ; आयुष्यात होईल प्रगती, मिळेल भरपूर पैसा

मार्च २०२४ मध्ये येणारे गोचरवरील राशींसाठी फायद्याचे राहील. मार्च महिना कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे, आता आपण जाणून घेऊ या. मेष राशीच्या लोकांसाठी मार्च महिना आत्मविश्वास वाढवणारा असेल. संधीचे सोने करून हे लोकं यशस्वी होऊ शकतात.
मिथुन राशीच्या लोक या महिन्यात नवीन लोकांना भेटतील आणि भविष्यासाठी नवीन योजना बनवतील. या लोकांचा आत्मविश्वास वाढताना दिसेन. प्रवासाचे योग जुळून येतील. कर्क राशीच्या लोकांसाठी मार्च महिना नातेसंबंधाच्या दृष्टीकोनातून चांगला राहील. कुटूंब आणि मित्रांबरोबरचे नाते दृढ करेन.

तुळ राशीच्या लोकांना मार्च महिन्यात वैवाहिक सौख्य लाभेल आणि कुटूंबातील सदस्यांवर प्रेम वाढेल. या लोकांना कुटूंबात आणि समाजात मान सन्मान आणि प्रेम मिळेल. मकर राशीच्या लोकांसाठी मार्च महिना करिअरच्या दृष्टीकोनातून खूप चांगला राहणार. प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)