March Rashi Gochar 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये काही ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव १२ राशींवर पडतो. काही दिवसात मार्च महिन्याला सुरूवात होईल. फेब्रुवारीप्रमाणे मार्चमध्ये देखील काही ग्रहांचे गोचर होईल, ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
पंचांगानुसार, २ मार्च २०२६ रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. तर ११ मार्च २०२६ रोजी गुरू मिथुन राशीत मार्गी होईल. १४ मार्च २०२६ रोजी वक्री बुधाचा कुंभ राशीत उदय होईल. १५ मार्च २०२६ रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. तर २१ मार्च २०२६ रोजी बुध कुंभ राशीत मार्गी होईल. तसेच २६ मार्च २०२६ रोजी मंगळाचा कुंभ राशीत उदय होईल. या ग्रहांच्या गोचराचा नक्कीच काही राशींवर प्रभाव पडेल.
मार्चमध्ये ‘या’ राशींचे गोचर करणार मालामाल
वृषभ (Vrushabh Rashi)
हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशींच्या व्यक्तींसाठीही मार्च महिना खूप खास असणार आहे. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना अत्यंत खास असणार आहे. या महिन्यात तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनासारखे यश मिळेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांनाही उत्तम यश मिळवता येईल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. कष्टाचे योग्य फळ मिळेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदी आनंद असेल.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी देखील हा महिना खूप उत्तम सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीदेखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील; ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
