Mangal-Shukra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. तर, ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. हे ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो.
पंचांगानुसार, मंगळ आणि शुक्र ०६ एप्रिल २०२६ रोजी नक्षत्र गोचर करणार आहेत. शुक्र ग्रह मध्यरात्री ०१ वाजून ०४ मिनिटांनी भरणी नक्षत्रात प्रवेश करणार असून मंगळ ग्रह रात्री १० वाजून ०४ मिनिटांनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. मंगळ-शुक्राचे हे गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक सिद्ध होणार आहे.
मंगळ-शुक्राचे गोचर ‘या’ राशींना मालामाल करणार
तूळ (Tula Rashi)
मंगळ-शुक्राचे गोचर तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय लाभदायी सिद्द होईल. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल.
धनु (Dhanu Rashi)
मंगळ-शुक्राचे गोचरामुळे धनु राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ-शुक्राच्या गोचराचा प्रभाव खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
