Mars Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात.

पंचांगानुसार, २० ऑक्टोबर रोजी मंगळाने त्याची नीच राशी असलेल्या कर्क राशीमध्ये प्रवेश केला असून तो पुढील ११० दिवस राहील. मंगळाचा हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.

Conjunction Of Shani And Budh
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Shadashtak Yog 2025
आजपासून बुध-मंगळ निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती भरपूर पैसा कमावणार
Mangal Gochar 2024
पुढील ७८ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशी कमावणार पैसा आणि प्रतिष्ठा
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा

मंगळाचे राशी परिवर्तन तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर

मेष

पुढील ११० दिवस मेष राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समाधान प्राप्त होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल.

वृश्चिक

मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक बदल घडवून आणणारे असेल. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. स्पर्धा परिक्षेची तयार करत असणाऱ्यांना हवे तसे यश संपादीत करता येईल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल.स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नात्यातील दूरावा दूर होईल. मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

हेही वाचा: आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

u

u

कर्क

कर्क राशींच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.वैवाहिक जीवन सुखमय राहील. आयुष्यातीस संकटं दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवी संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.

(टीपः सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader