Premium

२ ऑक्टोबरपासून ‘या’ पाच राशींना मिळेल अपार धन? केतू-मंगळदेवाच्या युतीमुळे होऊ शकता लखपती

केतू-मंगळदेवाच्या युतीमुळे काही राशींना पैसा, पद-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात…

Mangal Ketu Yuti
'या' राशींना मिळणार नशिबाची दमदार साथ?(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mangal Ketu Yuti 2023: ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांना खूप महत्व आहे. प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो, ज्याचा मानवी जीवनावर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. सध्या केतू शुक्राच्या तूळ राशीत आहे आणि २ ऑक्टोबर २०२३ रोजी मंगळ देखील तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतूचा संयोग असेल, जो काही राशींसाठी शुभ ठरु शकतो. मंगळ आणि केतूचा संयोग पाच राशीच्या लोकांना अपार यश, संपत्ती आणि आनंद घेऊन येणारा ठरु शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना होऊ शकतो फायदा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ पाच राशींना मिळणार पैसा?

सिंह राशी

मंगळ आणि केतू यांच्या युतीमुळे सिंह राशीच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येऊ शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश मिळू शकतो. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : ३० ऑक्टोबरपासून सिंहसह ‘या’ राशींना मिळेल अपार धन? राहू अन् गुरुची अशुभ युती संपल्याने येऊ शकतात सुखाचे दिवस )

कन्या राशी

मंगळ-केतू युती कन्या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ देऊ शकते. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता असून या काळात तुम्ही भरपूर संपत्ती निर्माण करू शकता. मीडिया आणि संवादाशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो.

धनु राशी

मंगळ-केतू युती धनु राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ देऊ शकते. या राशीतील लोक व्यापारात आपली प्रतिमा उंचावू शकतात. नोकरीत पदोन्नती, फायद्याचे दिवस, अभ्यासात यश, सन्मान मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा, मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते.

(हे ही वाचा : पुढील वर्षात वृषभसह ‘या’ राशींना मिळेल भरपूर पैसा? शनिदेव अन् देवगुरुच्या कृपेने कमाईत होऊ शकते वाढ )

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि केतूचा संयोग करिअरचे नवीन मार्ग उघडू शकतो. करिअरमध्ये उत्कृष्ट यश मिळू शकते, आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात नफा मिळू शकतो, नोकरदारांना पदोन्नती व वेतनवाढ होऊ शकते. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता.

कुंभ राशी

मंगळ आणि केतूचा संयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगल्या बातम्या घेऊन येणारा ठरु शकतो. या काळात तुम्हाला काही मोठा आर्थिक लाभही मिळू शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या दरम्यान तुमचे प्रेम जीवनही खूप चांगले असू शकते. या काळात धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mars ketu yuti 2023 in tula these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb

First published on: 27-09-2023 at 13:30 IST
Next Story
Personality Traits : कसा असतो ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव? वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…