Mars – Saturn Sextile: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. काही वेळा एखाद्या राशीत दोन ग्रहांचा संयोग होतो, ज्याचे चांगले परिणाम काही राशींच्या लोकांना होतात. यात ६ जुलै रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ आणि शनिदेव एकमेकांपासून ६० अंशाच्या कोनात स्थित झाले आहेत. असे मानले जाते की, जेव्हा मंगळ मेष राशीत प्रवेश करतो आणि शनि कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा अशा स्थितीला सेसटाइल म्हणतात. अशा स्थितीत सर्व राशीच्या लोकांवर सेसटाइल पोझिशनचा प्रभाव दिसून येतो. पण, अशा तीन राशी आहेत, ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. संपत्ती आणि त्यांच्या मालमत्तेतही वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मेष

मंगळ आणि शनिची सेसटाइल स्थिती मेष राशीधारकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचे नवीन नातेसंबंध तयार होऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही चांगली प्रगती करू शकता. नोकरीच्या नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुम्ही समाधानी राहू शकता. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे. या काळात पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. तसेच या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्तादेखील खरेदी करू शकता. याशिवाय तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढू शकते. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य चांगले राहू शकते.

mangal gochar 2024 Mars planet transit in taurus these zodiac sign will be rich astrology
पाच दिवसांनी पालटणार ‘या’ तीन राशीधारकांचे नशीब; मंगळाच्या वृषभ राशीतील प्रवेशाने प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश
July Month Astrology
July Month Astrology : जुलै महिन्यात ‘या’ चार राशींचे नशीब पालटणार, मिळेल बक्कळ पैसा
3 zodiac signs will be rich for 5 months from july maa lakshmi will give her blessing
Astrology : जुलैपासून पुढे पाच महिने ‘या’ तीन राशी होणार मालामाल; देवी लक्ष्मीच्या कृपेने येतील ‘अच्छे दिन’?
Shukra Gochar 2024 in Kark
लक्ष्मी नारायण योग पुढील २३ दिवस ‘या’ ५ राशींना देईल प्रचंड धन-दौलत; नशिबात राजासारखं जीवन जगण्याची संधी
Budh Vakri 2024
वाईट काळ संपणार! ४७ दिवसांनी ‘या’ राशींचा सुरु होतोय सुवर्णकाळ? बुधदेवाची वक्री चाल तुम्हाला देऊ शकते अपार श्रीमंती
Shani Rahu Nakshatra Gochar
शनी राहूच्या जोडीमुळे २०२५ पर्यंत तब्बल ८ राशी होणार अपार श्रीमंत; बघता बघता बदलेल आयुष्य, कुंडलीत कसे येतील अच्छे दिन?
Budh Gochar 2024
३ दिवसांनी ‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, हाती येणार अमाप पैसा? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात गडगंज श्रीमंत
Saturn's Nakshatra transformation for 87 days the holders
पैशांचा पाऊस पडणार! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ८७ दिवस ‘या’ तीन राशीधारकांना मिळणार पैसा अन् मान-सन्मान

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शनिची सेसटाइल स्थिती अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळू शकतो. तुमचे ठरलेले प्लॅनिंग यशस्वी होऊ शकते. यावेळी तुम्ही शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. याशिवाय उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी व्यावसायिकांना नव्या ऑफर्स येऊ शकतात.

मिथुन

मंगळ आणि शनिची सेसटाइल स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी भाग्य तुम्हाला साथ देईल. तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. त्याचवेळी या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. नोकरदारांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तसेच, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला देश-विदेशातही प्रवासाची संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.