scorecardresearch

५ एप्रिल २०२३ पर्यंत ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून चमकणार? मंगळ गोचर देणार प्रचंड धनलाभ व श्रीमंतीचा योग

Mangal Transit In Gemini : येत्या १३ मार्च ला मंगळ देव मिथुन राशीत मार्गीक्रमण करणार आहेत. यानंतर ५ एप्रिल २०२३ पर्यंत मंगळ मिथुन राशीत स्थिर असणार आहे.

Mars Transit Golden Rajyog For These Lucky Zodiac Signs OF March April 2023 You Will Get Huge Money Bank Balance Astrology
लक्ष्मीकृपेने ५ एप्रिल पर्यंत 'या' राशी होणार श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mars Transit In Gemini: साहस व पराक्रमाचा कारक मंगळ ग्रह मागील दोन महिन्यांपासून वृषभ राशीत स्थिर आहे. येत्या १३ मार्च ला मंगळ देव मिथुन राशीत मार्गीक्रमण करणार आहेत. यानंतर ५ एप्रिल २०२३ पर्यंत मंगळ मिथुन राशीत स्थिर असणार आहे. याच दिवसात हिंदू धर्मियांचे नववर्ष गुढीपाडवा व अत्यंत पवित्र असा चैत्र नवरात्रीचा सण सुद्धा येणार आहे. या शुभ प्रसंगी मंगळाच्या कृपेने व लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही राशींच्या भाग्यात मोठ्या उलाढाली होताना पाहायला मिळू शकतात. जेव्हा एखादा ग्रह राशी व नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा शुभ- अशुभ प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येतो. मंगळ गोचरासह आता तीन राशींच्या भाग्यात प्रचंड प्रगती व धनलाभाचे योग तयार होत आहेत. या भाग्यवान राशी कोणत्या हे पाहूया…

मंगळ गोचर ‘या’ राशींना देणार प्रचंड धनलाभ?

मिथुन (Gemini Zodiac)

मंगळ देव हे मिथुन राशीच्या ६ व्या व ११ व्या स्थानाचे स्वामी आहेत. १३ मार्च ला मंगळ गोचर होताच मिथुन राशीच्या गोचर कुंडलीत पहिल्या व सातव्या स्थानी मंगळाची कृपा दृष्टी असेल. या काळात तुमचा व्यवसाय फळाला येऊ शकतो. तुमचे आर्थिक स्रोत वाढल्याने घरी- दारी लक्ष्मीचा निवास असू शकतो. तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल तुमच्या सहज बोलून गेलेल्या एखाद्या वाक्यामुळे तुम्ही मने दुखावू शकता. यामुळे शक्य तेव्हा डोक्यावर बर्फ व जिभेवर साखरेचा खडा ठेवण्यास विसरू नका. आपले आईसह नाते आणखी दृढ होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo Zodiac)

मंगळ देव हे कन्या राशीच्या तिसऱ्या व आठव्या स्थानाचे स्वामी आहेत. १३ मार्चला मंगळ कन्या राशीच्या १० व्या स्थानी स्थिर असणार आहेत. तुम्ही ज्या कामासाठी मागील काही दिवसात प्रयत्न केले आहेत त्याचे गोड फळ मिळण्याची शक्यता आहे. आपण कामात अधिक व्यग्र असल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते म्हणूनच निदान सुट्टीचे दिवस महिन्याभरात तुमच्या कुटुंबासह घालवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक भावभावना व व्यक्तींपासून स्वतःला दूर ठेवा. तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीतूनच लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो.

हे ही वाचा<< महाभाग्य राजयोग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब पालटणार? सहा महिने बँक बॅलेन्सवर असू शकते लक्ष्मीकृपा

कर्क (Cancer Zodiac)

मंगळ देव हे कर्क राशीच्या पाचव्या व बाराव्या स्थानाचे स्वामी आहेत. गोचरासह मंगळ आपल्या राशीच्या ११ व्या स्थानी स्थिर होणार आहे. या काळात आपल्या नशिबात विवाहाचे योग आहेत. तुम्हाला मनाला भावणारा जोडीदार लाभू शकतो व हा पार्टनर तुमच्या धनलाभाचा मार्गही ठरू शकतो. येत्या काळात वाडवडिलांच्या संपत्तीवरून वादाची चिन्हे आहेत. तुमचे नातेवाईक तुमच्या मानसिक शांतीला घातक ठरू शकतात पण तुम्ही वाणीवरील नियंत्रण सोडू नका.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 11:29 IST
ताज्या बातम्या