Mangal Gochar 2026 Impact on Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रानुसार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी मंगळ ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर २ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत मंगळ कुंभ राशीतच भ्रमण करील आणि मग मीन राशीत जाईल. मंगळ हा ऊर्जा, धैर्य व कृतिशीलतेचा ग्रह मानला जातो. तो मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असून, योग्य स्थितीत असेल, तर तो व्यक्तीला पराक्रम, आत्मविश्वास व निर्णय क्षमता प्रदान करतो; मात्र प्रतिकूल स्थितीत उतावळेपणा वाढवू शकतो. मंगळाच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशींना विशेष लाभाच्या शक्यता निर्माण होऊ शकतात, असे ज्योतिषीय मत आहे. पाहूया सविस्तर…
मेष
मंगळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी अकराव्या स्थानी गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रात अकरावे स्थान हे उत्पन्न, लाभ व इच्छापूर्तीचे स्थान मानले जाते. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नफा वाढण्याचे संकेत मिळू शकतात.
कुटुंबातील मोठ्यांचे सहकार्य लाभदायी ठरू शकते. पालकांनाही आर्थिक स्थैर्य लाभण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढू शकतो. काही दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागू शकतात. आध्यात्मिक विषयांबद्दल आकर्षण वाढू शकते.
मिथुन
मंगळ मिथुन राशीच्या लोकांसाठी नवव्या स्थानी प्रवेश करत आहे. नववे स्थान हे भाग्य आणि धर्माचे मानले जाते. त्यामुळे या काळात भाग्याची साथ लाभण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. परदेशाशी संबंधित कामे मार्गी लागू शकतात. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळू शकते.
व्यवसायात विस्ताराची संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी किंवा मोठ्या भावंडांचे सहकार्य लाभदायी ठरू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहण्याची चिन्हे आहेत. प्रवासातूनही लाभ होऊ शकतो.
कन्या
मंगळ कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सहाव्या स्थानी भ्रमण करणार आहे. सहावे स्थान हे शत्रू, कर्ज आणि आरोग्याशी संबंधित मानले जाते. या काळात तुमच्यात धैर्य आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता लक्षवेधी ठरू शकते. लेखन, प्रशासन किंवा कायदेशीर क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे.
काही अडथळे दूर होऊ शकतात. जुन्या कर्जातून सुटका होण्याचे संकेत मिळू शकतात; परंतु नवे संबंध जपताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चुकीच्या संगतीमुळे अडचणी वाढू शकतात. आरोग्याकडे लक्ष देणे हितावह ठरेल.
तूळ
मंगळ तूळ राशीच्या लोकांसाठी पाचव्या स्थानी गोचर करेल. पाचवे स्थान बुद्धिमत्ता, संतती व सर्जनशीलतेशी संबंधित आहे. या काळात करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. नवीन प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.
संततीसंबंधित आनंददायी बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून लाभ होण्याचे संकेत आहेत. सर्जनशील क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना विशेष मान्यता मिळू शकते. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)

