Mars transit in Aquarius 2026 Impact on Zodiac Signs: होळीच्या रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकाशात घडलेली एक हालचाल अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे. ऊर्जा, धैर्य व कृतिशीलतेचे प्रतीक मानला जाणाऱ्या मंगळ ग्रहाने मकर राशीतून बाहेर पडून नुकताच कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी त्याचा प्रवास शतभिषा नक्षत्रामध्ये सुरू असल्याने या बदलाला विशेष महत्त्व दिले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची चाल बदलली की, परिणामही बदलू लागतात. काही राशींच्या लोकांवर त्याचा परिणाम सूक्ष्म स्वरूपात, तर काहींवर ठळकपणे जाणवू शकतो. होळीच्या दिवसापासून काही राशींच्या लोकांसाठी प्रगतीचे संकेत दिसू लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जाते. विशेषतः तीन राशींच्या लोकांसाठी हा काळ वेगळे रंग उधळू शकतो.

मेष

स्वतः मंगळ मेष राशीचा स्वामी असल्याने या गोचराचा प्रभाव अधिक स्पष्टपणे जाणवू शकतो, अशी शक्यता आहे. जणू काही आतापर्यंत थांबलेली गाडी अचानक वेग पकडू लागेल… अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेली फाईल पुढे सरकू शकते.

धनलाभ होऊ शकतो. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. करिअरमध्ये जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे, ज्यातून पुढील पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. व्यवसायात नफा होऊ शकतो, विशेषतः धाडसी निर्णय घेतल्यास फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.

मान-सन्मानात वाढ होऊ शकते. मित्रपरिवारात आणि सहकाऱ्यांमध्ये तुमच्या मताला अधिक महत्त्व दिले जाऊ शकते. आत्मविश्वास इतका वाढू शकतो की, पूर्वी कठीण वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतील. नवीन प्रकल्प, नवीन करार किंवा परदेशी संधींचे दरवाजेही उघडू शकतात अर्थात, हे सर्व ज्योतिषशास्त्रीय शक्यतांवर आधारित संकेत आहेत.

कर्क

हा काळ कर्क राशीसाठी हळूहळू, पण स्थिर बदल घेऊन येऊ शकतो. दीर्घकाळ मनात साचलेली अस्वस्थता कमी होण्याची शक्यता आहे. ज्या अडचणींनी त्रस्त केले होते, त्या आता मागे पडू लागतील, असे चित्र दिसू शकते.

करिअरमध्ये सुधारणा होऊ शकते. नवीन नोकरी मिळू शकते किंवा सध्याच्या नोकरीतच वेगळी आणि चांगली भूमिका मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत स्थिरता येऊ शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुनी गुंतवणूक परतावा देऊ शकते किंवा एखादा अडकून पडलेला पैसा हातात येऊ शकतो.

व्यावसायिकांना नवे ग्राहक मिळू शकतात. भागीदारीत सकारात्मक बदल होऊ शकतात. सहयोग मिळाल्यास घरातील वातावरणात तयार झालेला मानसिक ताण कमी होईल आणि निर्णयक्षमता वाढेल. आरोग्याबाबतही सकारात्मक संकेत मिळू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जाते.

सिंह

हा गोचर सिंह राशीसाठी प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारा ठरू शकतो. जणू काही प्रकाशझोत तुमच्यावर पडू लागल्याने समाजात मान-सन्मान मिळू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या संधीची प्रतीक्षा असेल, तर शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे.

धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे स्रोत मजबूत होऊ शकतात. खर्चांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळू शकते. व्यवसायात नफा होऊ शकतो, विशेषतः नवीन कल्पनांवर काम केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.

नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते किंवा बढतीचा मार्ग खुला होऊ शकतो. नेतृत्वगुणांना वाव मिळेल. सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिमा अधिक प्रभावी होऊ शकते. कौटुंबिक आयुष्यातही आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू शकतात.

एकूणच, होळीच्या रंगांसोबत काही राशींच्या लोकांसाठी संधींचेही रंग उधळले जाऊ शकतात, अशी ज्योतिषशास्त्रीय शक्यता आहे. मात्र, हे सर्व संकेत ग्रहस्थितीवर आधारित अंदाज आहेत. व्यक्तीचे प्रयत्न आणि परिस्थिती यांनुसार परिणाम बदलू शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)