Mars Transit In Taurus Zodiac Three Rashi Can get Huge Money More Income Profit Astrology Marathi | Loksatta

१३ मार्चपर्यंत ‘या’ राशी होतील अपार श्रीमंत? ५६ दिवस ‘या’ रूपात मंगळ देऊ शकतो बक्कळ धनलाभ

Mangal Planet Transit: मंगळ ग्रह हा वृषभ राशीत वर्गोत्तम झाला आहे. एखादा ग्रह वर्गोत्तम होणे म्हणजे काय तर जेव्हा ग्रह लग्न कुंडली व नवांश कुंडलीच्या एकाच राशीत येतो तेव्हा त्याची शक्ती सर्वाधिक होते.

Mars Transit In Taurus Rashi Three Zodiac Signs Can get Huge Money More Income Profit In Next 60 days Astrology Marathi
१३ मार्चपर्यंत 'या' राशी होतील अपार श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mangal Planet Vargottam: ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करतात ज्याचा थेट प्रभाव हा सर्व राशींवर होऊ शकतो. अलीकडेच ग्रहांचा सेनापती म्हणजेच मंगळ ग्रह हा वृषभ राशीत वर्गोत्तम झाला आहे. एखादा ग्रह वर्गोत्तम होणे म्हणजे काय तर जेव्हा ग्रह लग्न कुंडली व नवांश कुंडलीच्या एकाच राशीत येतो तेव्हा त्याची शक्ती सर्वाधिक होते. म्हणजेच त्याचा प्रभाव हा शुभ- अशुभ दोन्ही दृष्टीने पूर्ण शक्तीने पाहायला मिळतो. मंगळदेव १३ जानेवारीला आपल्या मूळ वृषभ राशीत वर्गोत्तम झाले आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे मंगळ हा वृषभ राशीसाठी शुभ असल्याने येत्या काळात वृषभच्या मित्र राशींवर सुद्धा धनाचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. धनलाभाचे योग असणाऱ्या या तीन राशी कोणत्या हे जाणून घेऊयात..

मेष (Aries Zodiac)

मंगळ ग्रह वृषभ राशीत वर्गोत्तम झाल्याने मेष राशीच्या मंडळींना सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत मंगळ ग्रह हा दुसऱ्या स्थानी स्थिर आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. येत्या काळात आपल्याला जुन्या गुंतवणुकीतून अडकलेले पैसे पुन्हा मिळण्यास मदत होईल. आपल्याला आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल तसेच कौटुंबिक कलह शक्य तितके टाळण्याचा प्रयत्न करा. मंगळ ग्रह आपल्या राशीचा स्वामी आहे त्यामुळे आपल्याला येत्या काळात धनलाभाची प्रबळ संधी मिळू शकते.

कर्क (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या मंडळींसाठी मंगळ ग्रह वर्गोत्तम होताच लाभदायक स्थिती तयार होणार आहे. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचा केंद्र त्रिकोण राजयोग सुद्धा तयार झाला आहे. तसेच मंगळ हा अत्यंत शुभ व लाभाच्या स्थानी विराजमान आहे. यामुळेच येत्या दिवसात कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड लाभ व प्रशंसा मिळू शकते. कोर्टाचे खटले मार्गी लागण्याचा शुभ काळ आहे. जर तुम्ही नव्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर यातून तुम्हाला सर्वोत्तम ऑफर मिळू शकते. संयम बाळगा.

हे ही वाचा<< ३० वर्षांनी आज शनिदेव घरी परतले; ‘या’ राशींना करणार श्रीमंत? साडेसातीमुळे बक्कळ धनलाभाची संधी

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीच्या मंडळींना सुद्धा मंगळदेव येत्या काळात काही सुखद अनुभव मिळवून देऊ शकतात तुम्हाला कामात नशिबाची तगडी साथ लाभू शकते. भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी येणारे दिवस शुभ ठरू शकतात. आपल्याला रिअल इस्टेटच्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीचे सुद्धा महत्त्वपूर्ण टप्पे येतील. याकाळात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 13:26 IST
Next Story
तब्बल ३० वर्षांनी झाली शनि- सुर्याची युती; वर्षभरात ‘या’ राशी होऊ शकतात प्रचंड श्रीमंत