Mangal Planet Transit In Cancer: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, शौर्य, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. २० ऑक्टोबर रोजी मंगळाने त्याची नीच राशी असलेल्या कर्क राशीमध्ये प्रवेश केला असून या राशीत तो तब्बल १५८ दिवस राहील. मंगळाचा हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.

मंगळ ‘या’ तीन राशींना देणार आनंदी आनंद

मेष

Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
3rd November 2024 Rashi Bhavishya
भाऊबीज, ३ नोव्हेंबर पंचांग: अनुराधा नक्षत्रात १२ राशींचा रविवार जाणार आनंदात, जोडीदाराचा सहवास ते आर्थिक भरभराट होणार
guru gochar in taurus Diwali 2024 | guru vakri 2024
दिवाळीपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब, १२ वर्षांनंतर गुरुच्या वक्रीमुळे मिळणार अपार पैसा अन् यश
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : फक्त ३ दिवसानंतर या राशींचे बदलणार नशीब, शुक्र गोचरमुळे मिळणार अपार पैसा अन् धन
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी

मेष राशींच्या व्यक्तींसाठी मंगळाचे कर्क राशीतील राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समाधान प्राप्त होईल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना नवी संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

कर्क

मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन कर्क राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आयुष्यातीस संकटं दूर होण्यास मदत होईल. नात्यातील दूरावा दूर होईल. मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

हेही वाचा: मंगळ देणार दुप्पट पैसा! ‘या’ चार राशीच्या व्यक्ती मिळवणार धनसंपत्ती अन् प्रत्येक कामात यश

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन खूप सकारात्मक बदल घडवून आणणारे असेल. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. स्पर्धा परिक्षेची तयार करत असणाऱ्यांना हवे तसे यश संपादीत करता येईल. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. )

Story img Loader