Mangal Planet Transit: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्र वेळोवेळी संक्रमण करत असतात. ग्रहांचे हे संक्रमण काहींसाठी शुभ तर काहींसाठी राशींसाठीअशुभ असते. मंगळाने १० ऑगस्ट रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश केला आहे आणि सुमारे ६६ दिवस मंगळ वृषभ राशीत विराजमान राहील. मंगळाच्या राशीतील बदलाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल. पण अशा तीन राशी आहेत ज्यांच्यासाठी हा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.

कर्क राशी

मंगळाच्या राशी बदलामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकते. कारण मंगळ देव तुमच्या राशीतून ११व्या घरात भ्रमण करणार आहे. वैदिक ज्योतिषात, ११ वे घर उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. त्यामुळे या कालावधीत तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच नोकरी आणि व्यवसायात देखील विशेष लाभ होऊ शकतो. यासोबतच तुमची आर्थिक बाजूही मजबूत होईल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. तसेच वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते.

Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Shani Nakshatra Gochar On 6th April 2024
३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत
mars gochar 2024 mangal transit in pisces these zodiac sign get more profit
१८ महिन्यांनंतर मंगळ मीन राशीत करणार प्रवेश, ‘या’ राशींना अच्छे दिन; धनसंपत्तीत होऊ शकते भरभराट
falgun purnima 2024
फाल्गुन पोर्णिमेला निर्माण होतेय दुर्मिळ युती! या ३ राशींच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल! प्रगतीसह मिळेल बक्कळ पैसा

(हे ही वाचा: सूर्य देव सिंह राशीत प्रवेश करणार; ‘या’ ४ राशींच्या लोकांनी वेळीच व्हा सावधान!)

सिंह राशी

मंगळ राशीच्या बदलाने तुमच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू झाले आहेत कारण मंगळ तुमच्या राशीतून दशम भावात प्रवेश करत आहे, जो व्यवसाय आणि नोकरीचे घर मानला जातो. त्यामुळे, यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा एखाद्या नवीन व्यवसायाची संधी समोरून चालून येऊ शकते. तसेच, नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊन तुम्हाला बढती मिळू शकते. तसेच, या काळात नवीन व्यावसायिक संबंध तयार करून चांगले पैसे कमावता येतील. या काळात तुम्ही मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्याचा निर्णयही घेऊ शकता.

कन्या राशी

मंगळाच्या राशी बदलामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते. कारण मंगळ तुमच्या राशीतून नवव्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात प्रत्येक कामात नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जे काम तुमच्यासाठी बरेच दिवस रखडले होते ते देखील या काळात पूर्ण होईल. यावेळी तुम्ही व्यवसायाशी संबंधित छोट्या किंवा मोठ्या सहलीला जाऊ शकता. जे तुम्हाला भविष्यात चांगले पैसे कमवून देऊ शकतात. त्याचबरोबर स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसत आहे. म्हणजेच ते कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतात किंवा कोणत्याही उच्च संस्थेत प्रवेश घेऊ शकतात.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)