Saturn’s Sade sati Comes to an End: नवं वर्ष जवळ आलं की सर्वांच्याच मनात एकच प्रश्न असतो, २०२६ माझ्यासाठी कसं जाणार? ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्ष काही खास संकेत घेऊन येत आहे. तारे, ग्रह आणि योग यांच्या हालचालींनी असे इशारे दिले आहेत की एका विशिष्ट राशीचा आगामी काळ अत्यंत परिणामकारक ठरू शकतो, कारण आता २०२५ मध्ये या एका राशीवरील शनीच्या साडेसातीचा प्रभावदेखील संपला आहे, त्यामुळे २०२६ मध्ये या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदलांची अपेक्षा असू शकते. नवीन वर्षात करिअर, व्यवसाय, नाती, आरोग्य आणि आर्थिक स्थितीत मोठे बदल घडू शकतात… या राशीबद्दल ज्योतिषी काय म्हणतात ते जाणून घेऊया.
करिअर आणि व्यवसाय : नवा वेग, नवीन संधी
- ज्योतिषानुसार, २०२६ हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने गती देणारं वर्ष ठरू शकतं.
- नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर हा काळ मदत करू शकतो.
- पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांना काही अनपेक्षित फायदे मिळू शकतात.
- नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, विभागबदल किंवा जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
- शिक्षण, व्यवस्थापन, फायनान्स आणि कायदा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ग्रहांची स्थिती विशेष अनुकूल दिसत आहे.
- धैर्य, सातत्य आणि योग्य नियोजन असेल तर यश तुमच्या दिशेने येऊ शकतं, असे ज्योतिष सांगतात.
आर्थिक स्थिती : कमाईचे नवे स्रोत उपलब्ध
- २०२६ या वर्षात भाग्याची साथ आर्थिक क्षेत्राला चांगली मिळू शकते.
- नियमित उत्पन्न वाढू शकते.
- कमाईचे नवे स्रोतही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
- अनपेक्षित आर्थिक लाभामुळे तुमचा बँक बॅलेन्स वाढू शकतो.
- जमीन, इमारत किंवा मालमत्तासंबंधित व्यवहार या वर्षी शुभ ठरू शकतात.
नाती आणि प्रेमसंबंध : गोडी आणि मधुर क्षण
- प्रेमसंबंधांच्याबाबतीत हे वर्ष मधुर क्षण देणारं ठरू शकतं.
- तुमच्या वैवाहिक जीवनात चांगला आनंद येऊ शकतो.
- शनीच्या कृपेने नात्यांमध्ये स्थैर्य आणि विश्वास वाढू शकतो.
- प्रेमविवाहाची शक्यता दिसत आहे.
आरोग्य : अनुकूल राहू शकते
- आरोग्याच्या दृष्टीने २०२६ सर्वसाधारणपणे अनुकूल राहू शकते.
- जून ते ऑक्टोबर हा काळ विशेष चांगला ठरण्याची शक्यता आहे.
- रोगांपासून संरक्षण, ऊर्जावृद्धी आणि मानसिक स्थैर्य मिळू शकते.
आणि अखेर… या राशीची संपली साडेसाती
या सर्व ज्योतिषशास्त्रीय संकेतांचा केंद्रबिंदू म्हणजे एकच गोष्ट शनीची साडेसाती संपल्यानंतर एखाद्या राशीला मिळत असलेला दिलासा! ज्यातून बाहेर पडल्यावर नव्या वर्षात करिअर, व्यवसाय, नाती आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत मिळत आहेत.
आणि त्या राशीचे नाव आहे… मकर!
२०२५ मध्ये साडेसातीचा प्रभाव ओसरल्यानंतर २०२६ हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींना मोठ्या परिवर्तनाचे वर्ष ठरू शकते, अशी फक्त ज्योतिषशास्त्रीय शक्यता व्यक्त केली जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
