धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने आर्थिक उन्नती होते मानण्यात येते. त्याचबरोबर तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात. तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. तुळशीची दररोज पूजा केल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होते असं म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा अनेक राशी आहेत, ज्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव असते.
चला जाणून घेऊया कोणकोणत्या राशी आहेत ज्यावर धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी कृपाळू आहे. यासोबतच देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींना इजा होत नाही.
सिंह राशी
ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते . या राशीचे लोक कोणतेही काम सुरू करतात, त्यांना नेहमी माता लक्ष्मीची साथ मिळते आणि कामात यश देखील मिळते. त्याचबरोबर या व्यक्तींना समाजात मान देखील मिळतो. त्याचबरोबर कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना देखील करावा लागत नाही.
तूळ राशी
या राशीच्या लोकांना नेहमी माता लक्ष्मीची साथ मिळू शकते. लक्ष्मीच्या कृपेने या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. तसेच सर्व कामे वेळेवर पूर्ण होतात. जी लोक नवीनव्यवसाय नोकरी सुरू करणार आहेत त्यांना यावेळी लक्ष्मीची चांगली साथ मिळू शकते.
( हे ही वाचा: गणपतीच्या लाडक्या आहेत ‘या’ ३ राशी; २०२३ सुरू होताच देवबाप्पा देतील प्रचंड धनलाभाची संधी)
वृषभ राशी
या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. तसंच या राशीला प्रत्येक सुख-सुविधा नेहमीच मिळतात. या राशीच्या लोकांना कधीही पैशाचे नुकसान सहन करावे लागत नाही. या राशीचे लोक खूप मेहनती आणि बुद्धिमान असतात. या लोकांकडे पैसा भरपूर असतो. लक्ष्मी नेहमी त्यांच्या सोबत असते.