May Graha Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक महिन्यामध्ये ग्रहांचे ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. मे २०२६ मध्ये देखील काही मोठ्या ग्रहांचे गोचर होणार आहे. ज्यात सूर्य, मंगळ, शनी, गुरू या ग्रहांचा समावेश असेल. या ग्रहांच्या चालीचा १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर विशेष प्रभाव पडेल. मे महिन्याच्या सुरुवातीला बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल. तसेच १५ मे रोजी वृषभ राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होईल. मेष आणि वृषभ राशीतील हा राजयोग १२ पैकी काही राशींच्या लोकांचे नशीब चमकण्यास मदत होईल.
तसेच या महिन्यात शनीदेव अधिक सक्रिय असतील. १३ एप्रिल २०२६ रोजी शनीचा उदय झाला होता. या काळात शनीचा प्रभाव काही राशींवर अधिक पाहायला मिळेल. तसेच देवगुरू देखील ०२ जून २०२६ रोजी कर्क राशीत प्रवेश करण्यापूर्वी काही राशींच्या आयुष्यात बदल करू शकतात.
ग्रहांचे गोचर ‘या’ राशींना मालामाल करणार
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीसाठी हा काळ अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल.
धनु (Dhanu Rashi)
हा काळ धनु राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींनाही हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ खूप लाभदायी असेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
