May Graha Gochar Negative Impact 2026: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक महिन्यामध्ये ग्रहांचे ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. मे २०२६ मध्ये देखील काही मोठ्या ग्रहांचे गोचर होणार आहे. ज्यात सूर्य, मंगळ, शनी, गुरू या ग्रहांचा समावेश असेल. या ग्रहांच्या चालीचा १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर विशेष प्रभाव पडेल. मे महिन्याच्या सुरुवातीला बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल. तसेच १५ मे रोजी वृषभ राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होईल. मेष आणि वृषभ राशीतील हा राजयोग १२ पैकी काही राशींच्या लोकांचे नशीब चमकण्यास मदत होईल. तर काहींच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात.

तसेच या महिन्यात शनीदेव अधिक सक्रिय असतील. १३ एप्रिल २०२६ रोजी शनीचा उदय झाला होता. या काळात शनीचा प्रभाव काही राशींवर अधिक पाहायला मिळेल. तसेच देवगुरू देखील ०२ जून २०२६ रोजी कर्क राशीत प्रवेश करण्यापूर्वी काही राशींच्या आयुष्यात बदल करू शकतात.

‘या’ राशींना संकटाचा सामना करावा लागणार

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या लोकांसाठी या काळात अडचणी वाढू शकतात. या राशीच्या व्यक्तींना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. एक मोठा फायदेशीर करार तुमच्या हातातून निसटू शकतो. शरीरातील दुर्बलता जाणवेल. या काळात कुणालाही उधार देणे टाळा, पैसा अडकू शकतो. घरगुती वाद आणि क्रोधाचा उद्रेक तुमचे संबंध बिघडवू शकतो. या काळात जवळच्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला संघर्षाला सामोरे जावे लागू शकते.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीसाठी हा काळ मानसिक तणावाने भरलेला राहू शकतो. कार्यस्थळी अडचणी निर्माण होऊ शकतात. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. मानसिक थकवा जाणवेल, वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात.मानसिक तणावामुळे शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. विनाकारण पैसे खर्च केल्याने तुमचे बजेट नंतर बिघडू शकते. करिअरमध्ये यश मिळणार नाही. आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही लोकांना दिशाभूल करणारी बातमी मिळू शकते.

वृश्चिक (Vruschik) Rashi)

वृश्चिक राशीच्या लोकांची कुणाकडूनही फसवणूक होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. नोकरीशी संबंधित ऑफर जाऊ शकतात. आरोग्य खालावणे, कामाच्या ठिकाणी वादविवाद, घरातील सदस्यांशी मतभेद, अचानक खर्च आणि व्यापारात घट याचा अनुभव येऊ शकतो. या काळात मोठं आर्थिक नुकसानदेखील होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य चिंतेचे कारण असू शकते. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)