8 May Horoscope: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दैत्यांचे गुरु शुक्र हा शक्तिशाली ग्रह मानला जातो. हा ग्रह ठराविक कालानंतर राशीसोबत नक्षत्रही बदलतो. सध्या शुक्र आपल्या स्वतःच्या वृषभ राशीत असून मालव्य आणि विपरीत राजयोग तयार करत आहे. तसेच तो रोहिणी नक्षत्रात आहे. पण ८ मे रोजी शुक्र नक्षत्र बदलून मृगशीरा नक्षत्रात प्रवेश करेल.

शुक्र मंगळाच्या नक्षत्रात गेल्यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. या राशींना नशीब साथ देईल आणि पद, प्रतिष्ठा, व्यवसायात चांगले परिणाम दिसू शकतात. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. जाणून घ्या, शुक्र मृगशीरा नक्षत्रात गेल्यावर कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ८ मे रोजी रात्री ९:५१ वाजता शुक्र मृगशीरा नक्षत्रात प्रवेश करेल आणि २० मेपर्यंत तिथे राहील. त्यानंतर तो आर्द्रा नक्षत्रात जाईल. आकाशात असलेल्या २७ नक्षत्रांपैकी मृगशीरा हे पाचवे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. याचे पहिले दोन चरण वृषभ राशीत आणि पुढचे दोन मिथुन राशीत येतात. त्यामुळे या नक्षत्रावर बुधाचाही थोडा प्रभाव असतो. तसेच शुक्र १४ मेपर्यंत वृषभ राशीत राहील आणि त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल.

सिंह राशीवर परिणाम (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र मृगशीरा नक्षत्रात जाणे खास ठरू शकते. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र कामासाठी थोडी जास्त मेहनत आणि धावपळ करावी लागू शकते. पण त्यातून चांगले यश आणि फायदा मिळेल. प्रगतीची चांगली शक्यता आहे.

कन्या राशीवर परिणाम (Virgo Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी भाग्य जोरात राहील. नववा आणि दहावा भावात शुक्र असल्यामुळे नशिबाची साथ मिळेल. भाग्यात वाढ होईल. तुम्ही जे काम कराल त्यात यश मिळेल. काही कामे सहज पूर्ण होतील. कमी मेहनतीत जास्त फायदा मिळू शकतो. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशीवर परिणाम (Scorpio Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी शुक्र मृगशीरा नक्षत्रात जाणे अनुकूल ठरेल. वैवाहिक आयुष्यातील समस्या कमी होतील. नातेसंबंध सुधारतील. तुम्ही इतरांवर चांगला प्रभाव टाकू शकाल. ज्या गोष्टींसाठी खूप दिवस प्रयत्न करत होतात, त्या मिळू शकतात. मात्र आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)