May Horoscope: बुध ग्रह मे महिन्याच्या सुरुवातीला २ तारखेला मेष राशीत अस्त होणार आहे. बुध २२ दिवस अस्त अवस्थेत राहील. काही राशींकरिता बुधाचं अस्त होणं अडचणीचं ठरू शकतं. या लोकांनी आर्थिक आणि करिअरशी संबंधित निर्णय खूप विचार करून घ्यावेत. चला जाणून घेऊया या राशींविषयी आणि बुध अस्त काळात करायचे उपाय.
मेष राशी (Aries Horoscope)
बुध ग्रह २ मे रोजी अस्त होणार असल्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येऊ शकतात. यासोबतच करिअरमध्येही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. आई-वडिलांशी बोलताना शब्दांचा वापर जपून करा, नाहीतर मतभेद होऊ शकतात. बुध अस्त काळात गणपतीची पूजा केल्यास चांगले फळ मिळू शकते.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे बुधाचं अस्त होणं तुमच्यासाठी चांगलं मानलं जात नाही. तुमची एकाग्रता कमी होऊ शकते. शिक्षण क्षेत्रात अडचणी येऊ शकतात. मोठ्या पैशांचे व्यवहार विचार करून करा, नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकते. उपाय म्हणून गायीला हिरवा चारा खाऊ घाला.
कन्या राशी (Virgo Horoscope)
बुध तुमच्याही राशीचा स्वामी आहे, त्यामुळे त्याचं अस्त होणं तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या त्रस्त होऊ शकता. मेहनतीचं अपेक्षित फळ न मिळाल्यानेही तणाव येऊ शकतो. पैशांच्या बाबतीत सतर्क राहा. उपाय म्हणून भगवान शिवाची पूजा करा.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
तुमच्यासाठी बुधाचं अस्त होणं खर्च वाढण्याचं कारण ठरू शकतं. जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अडकले असाल तर खूप काळजीपूर्वक निर्णय घ्या. चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. करिअरमध्येही चढ-उतार येऊ शकतात. उपाय म्हणून गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
