Vipreet Rajyog: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे खास महत्त्व असते. अशा वेळी जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम जागतिक स्तरापासून सर्व १२ राशींवर दिसून येतो. अशाच नवग्रहांपैकी एक ग्रहांचा राजकुमार बुध देखील ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. बुध सध्या मीन राशीत विराजमान आहे आणि मे महिन्याच्या शेवटी तो स्वतःच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

बुधाच्या मिथुन राशीत प्रवेशामुळे काही राशींवर विपरीत राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे काही राशींवर विशेष प्रभाव दिसून येणार आहे. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर केले जात आहे. जाणून घ्या, विपरीत राजयोग कोणत्या राशींसाठी लकी ठरू शकतो…

द्रिक पंचांगानुसार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल. तेथे तो २२ जूनपर्यंत राहील. या काळात विपरीत राजयोगासोबत लक्ष्मी नारायण राजयोग देखील तयार होईल, कारण मिथुन राशीत शुक्रही विराजमान असतील.

विपरीत राजयोग कधी तयार होतो?

वैदिक पंचांगानुसार, विपरीत राजयोग तेव्हा तयार होतो जेव्हा कुंडलीच्या ६व्या, ८व्या किंवा १२व्या भावाचा स्वामी याच त्रिक भावांपैकी दुसऱ्या भावात स्थित असतो. हा राजयोग तयार झाल्यावर लोकांना अचानक धनलाभापासून प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते.

कर्क राशीवर विपरीत राजयोगाचा प्रभाव

या राशीच्या लोकांसाठी बुध महाराज खूप लाभदायक ठरू शकतात. या राशीच्या गोचर कुंडलीत तिसऱ्या आणि बाराव्या भावाचा स्वामी बुध आहे, जो मिथुन राशीत गोचर करून बाराव्या भावात राहील. अशा वेळी विपरीत राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या दीर्घकाळ चालत आलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. अनावश्यक खर्चातून सुटका मिळू शकते. आरोग्य चांगले राहणार आहे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल आणि अनेक तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करू शकता. भाऊ-बहिणीसोबत चांगला वेळ जाईल. आत्मविश्वासात वाढ दिसेल. संयमाने पुढे गेलात तर यश मिळू शकते.

मकर राशीवर विपरीत राजयोगाचा प्रभाव

या राशीच्या लोकांसाठी बुधाचे मिथुन राशीत जाऊन विपरीत राजयोग तयार करणे लाभदायक ठरू शकते. या राशीच्या गोचर कुंडलीत नवव्या आणि सहाव्या भावाचा स्वामी बुध आहे. अशा वेळी मिथुन राशीत प्रवेश करून बुध सहाव्या भावात विराजमान होईल. त्यामुळे या राशीच्या लोकांना कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळू शकते. दैनंदिन आयुष्यातील समस्या संपुष्टात येऊ शकतात. आयुष्यात चालू असलेल्या अडचणी, आव्हाने आणि संघर्ष हळूहळू कमी होऊ शकतात. तुम्ही शत्रूंवर मात करू शकता. नोकरी करणाऱ्यांना चांगले परिणाम दिसू शकतात.

या काळात तुम्ही कर्ज किंवा लोन घेण्याचा विचार करत असाल, तर त्यात यश मिळू शकते. तसेच जुने कर्ज फेडण्यातही यश मिळू शकते.

वृश्चिक राशीवर विपरीत राजयोगाचा प्रभाव

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध देव अकराव्या आणि आठव्या भावाचे स्वामी आहेत आणि मिथुन राशीत गोचर करून बुध आठव्या भावात विराजमान राहतील. अशा वेळी या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. दीर्घकाळ चालत आलेला मानसिक ताण कमी होऊ शकतो. सासरच्या मंडळींसोबत संबंध चांगले होऊ शकतात. सासरकडील सुरू असलेल्या समस्या सुटू शकतात. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचे योग आहेत. गुंतवणूक केल्यास फायदा मिळू शकतो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)