Budh Gochar: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला खास महत्त्व असते. एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम जगभर आणि सर्व १२ राशींवर दिसतो. नवग्रहांपैकी बुध ग्रह ठराविक काळानंतर राशी बदलतो. सध्या बुध मीन राशीत आहे आणि मे महिन्याच्या शेवटी तो स्वतःच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या प्रवेशामुळे काही राशींवर विपरीत राजयोग तयार होणार असून त्याचा खास फायदा मिळू शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे.
द्रिक पंचांगानुसार, २९ मे रोजी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी बुध मिथुन राशीत प्रवेश करेल आणि २२ जूनपर्यंत तिथे राहील. या काळात विपरीत राजयोगाबरोबर लक्ष्मी नारायण राजयोग देखील तयार होईल, कारण मिथुन राशीत शुक्रही असेल.
विपरीत राजयोग कधी बनतो?
जेव्हा कुंडलीतील सहावा, आठवा किंवा बारावा भाव (त्रिक भाव) यांचे स्वामी याच भावांपैकी दुसऱ्या भावात बसतात, तेव्हा विपरीत राजयोग तयार होतो. यामुळे अचानक धनलाभ आणि विविध क्षेत्रात यश मिळू शकते.
कर्क राशीवर परिणाम
कर्क राशीच्या लोकांसाठी बुध लाभदायक ठरू शकतो. बुध तिसऱ्या आणि बाराव्या भावाचा स्वामी असून मिथुन राशीत जाऊन बाराव्या भावात राहील. त्यामुळे विपरीत राजयोग तयार होईल. जुने त्रास कमी होतील, खर्चावर नियंत्रण येईल. आरोग्य सुधारेल. अध्यात्माकडे ओढ वाढेल आणि तीर्थयात्रेची शक्यता आहे. भावंडांसोबत चांगला वेळ जाईल. आत्मविश्वास वाढेल. संयमाने काम केल्यास यश मिळेल.
मकर राशीवर परिणाम
मकर राशीसाठी बुधाचा मिथुन राशीत प्रवेश फायदेशीर ठरू शकतो. बुध नवव्या आणि सहाव्या भावाचा स्वामी असून सहाव्या भावात राहील. कोर्ट-कचऱ्याच्या प्रकरणात यश मिळू शकते. रोजचे त्रास कमी होतील. शत्रूंवर विजय मिळवू शकता. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. कर्ज घेणे किंवा कर्ज फेडणे यातही यश मिळू शकते.
वृश्चिक राशीवर परिणाम
वृश्चिक राशीसाठी बुध अकराव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे. मिथुन राशीत तो आठव्या भावात राहील. त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. मानसिक तणाव कमी होईल. सासरच्या मंडळींसोबत संबंध सुधारतील. वारसाहक्काची मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
