May Horoscope Lucky Zodiacs: मे महिन्यात मंगळ, सूर्य, बुध आणि शुक्र हे सर्व ग्रह आपापली रास बदलणार आहेत. ११ मे रोजी मंगळ मेष राशीत प्रवेश करेल, तर सूर्यदेव वृषभ राशीत जातील. तसेच शुक्र १४ मे रोजी मिथुन राशीत गोचर सुरू करेल आणि बुध १५ मे रोजी वृषभ राशीत जाईल.
२९ मे रोजी बुध पुन्हा रास बदलून मिथुन राशीत प्रवेश करेल. या ग्रहांच्या बदलामुळे कोणत्या २ राशींना राजयोग तयार होतो, ते जाणून घेऊया.
मकर राशी (Capricorn Horoscope May)
मकर राशीच्या लोकांसाठी मे महिना पैशांच्या बाबतीत खूप चांगला ठरेल. गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. मालमत्ता खरेदीतूनही नफा मिळू शकतो. काही लोक पैसे कमावण्यासाठी नवीन मार्ग शोधू शकतात.
उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या योजना यशस्वी होतील आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप शुभ आहे. कामाच्या बाबतीत हा महिना उत्तम राहील. नोकरी करणारे लोक खूप चांगले काम करतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील.
मीन राशी (Pisces Horoscope May)
मीन राशीच्या लोकांसाठीही मे महिना खूप चांगला राहील. गुंतवणुकीतून फायदा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
कामात चांगली प्रगती होईल. नोकरीत बढती मिळण्याचे योग आहेत. जर तुम्ही नोकरी शोधत असाल, तर या महिन्यात चांगल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात. एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. अनेक मार्गांनी पैसे मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. पितृ संपत्तीतूनही चांगला फायदा मिळू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
