May Horoscope: ३० मे २०२६ रोजी रात्री २ वाजून २८ मिनिटांनी केतू ग्रह मघा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करेल आणि तो २ ऑगस्टपर्यंत तिथेच राहील. ज्योतिषानुसार या नक्षत्रातील केतूचं गोचर ३ राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. या राशींचं नशीब या काळात चमकेल. पुढील ६५ दिवस करिअरमध्ये मोठं यश मिळेल. तसेच धनलाभाचेही योग तयार होतील. आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होईल. चला जाणून घेऊया त्या ३ राशी कोणत्या आहेत.
‘या’ ३ राशींचं नशीब चमकेल
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी केतूचं गोचर फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये चांगले परिणाम दिसतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. अडकलेले पैसे अचानक मिळू शकतात. परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी केतूचं हे गोचर लाभदायक राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. बॉस आणि सीनियर तुमच्या कामाचं कौतुक करतील. प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. अचानक उत्पन्न वाढू शकतं. वेगवेगळ्या मार्गांनी पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही फायदा होऊ शकतो.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांना केतू अचानक लाभ देईल. मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्यांना मोठं यश मिळू शकतं. तुम्ही करिअरमध्ये पुढे राहाल. व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
पुढील ६५ दिवस राहतील शानदार
या 3 राशींसाठी पुढील ६५ दिवस खूप चांगले राहतील. केतू तुम्हाला अंतर्ज्ञान (इंट्यूशन) शक्ती देईल, त्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल. याचा तुम्हाला करिअरमध्ये मोठा फायदा होईल. तुम्ही तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
