May Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार मंगळ ग्रह हा शौर्य, धाडस, पराक्रम, राग आणि मालमत्तेचा कारक मानला जातो. मंगळ साधारणपणे ४५ दिवसांनी राशी बदलतो. सध्या मंगळ मीन राशीत आहे आणि ११ मे रोजी तो स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. पण सिंह, कर्क आणि कन्या राशीच्या लोकांना याचा विशेष शुभ फायदा होऊ शकतो. या काळात धाडस आणि आत्मविश्वास वाढू शकतो. हे भाकीत चंद्र राशीनुसार सांगितले आहे.
पंचांगानुसार ११ मे रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी मंगळ मेष राशीत प्रवेश करेल आणि २० जूनपर्यंत तिथेच राहील. मंगळ स्वतःच्या राशीत आला की चांगले परिणाम देतो. या काळात व्यक्तीचे धैर्य वाढते आणि जमीन-जुमल्याच्या व्यवहारातही फायदा होऊ शकतो.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी मंगळाचा हा गोचर खूप चांगला ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीच्या भाग्य स्थानात येत आहे. त्यामुळे या काळात नशिबाची साथ मिळेल आणि अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील.
नोकरीत प्रगती, प्रमोशन आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित लोकांना यश मिळू शकते.
पण मंगळाच्या उर्जेमुळे अहंकार आणि घाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. वडील, गुरु किंवा वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांतपणे वागणे गरजेचे आहे.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी मंगळाचा राशी बदल सकारात्मक ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या कर्म स्थानात येणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वेगाने प्रगती होण्याचे संकेत आहेत.
नोकरीत प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना विस्तार आणि नफा मिळण्याची शक्यता आहे.
समाजात मान-सन्मान वाढेल आणि नेतृत्व करण्याची संधी मिळेल. रिअल इस्टेट, पोलीस, सैन्य, इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होऊ शकतो.
मात्र कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. ऑफिसमध्ये स्पर्धा किंवा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवून शहाणपणाने निर्णय घ्या.
कन्या राशी (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी मंगळ अष्टम भावात गोचर करणार आहे. हा भाव अचानक बदल, गुप्त लाभ, आयुष्य आणि रहस्याशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या काळात अचानक फायदा किंवा अनपेक्षित लाभ मिळू शकतो.
गुंतवणुकीतून फायदा, विमा किंवा वारसाहक्कातून लाभ होण्याची शक्यता आहे. रिसर्च आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील लोकांना याचा चांगला फायदा मिळू शकतो.
मंगळ हा तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावाचा स्वामी असल्यामुळे या काळात धाडस, आत्मविश्वास आणि पराक्रम वाढेल. भाऊ-बहिणींचे सहकार्यही मिळेल.
पण अष्टम भावातील मंगळामुळे पोट, रक्त किंवा तणावाशी संबंधित त्रास होऊ शकतो. नातेसंबंधात गैरसमज किंवा वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम आणि समतोल राखणे महत्त्वाचे आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
