May Horoscope: नवपंचम योग तेव्हा तयार होतो जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून पाचव्या आणि नवव्या स्थानावर असतात. २७ मेच्या रात्री चंद्र तूळ राशीत प्रवेश करताच शुक्र आणि चंद्र यांच्यात नवपंचम योग तयार झाला आहे. हा योग ३० मेच्या सकाळपर्यंत राहणार आहे.

शुभ ग्रह मानले जाणारे शुक्र आणि चंद्र यांच्या या नवपंचम योगाचा काही राशींना मोठा फायदा होणार आहे. या राशींसाठी मे महिन्याचा शेवट आनंददायी आणि आर्थिक लाभ देणारा ठरू शकतो. आज आपण या राशींविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

नवपंचम योगाच्या काळात शुक्र तुमच्या राशीत असतील, तर चंद्र तुमच्या पाचव्या स्थानात असतील. त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. काही लोकांना मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. शुक्राच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनातही चांगले बदल दिसतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आणि मोठ्यांचे सहकार्य मिळेल.

सिंह राशी (Leo Horoscope)

नवपंचम योगात शुक्र तुमच्या लाभ स्थानात असतील, तर चंद्र पराक्रम भावात असतील. त्यामुळे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांत आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या राशीच्या लोकांना शेअर मार्केटमधूनही फायदा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना चांगली डील मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्येही गोडवा वाढेल.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

नवपंचम योगाच्या काळात चंद्र तुमच्या लाभ स्थानात आणि शुक्र सप्तम भावात असतील. त्यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल दिसू शकतात. घरातील लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)