May Horoscope 2026: मे महिन्यात सूर्य आपल्या स्वतःच्या कृतिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात सूर्य येणे खूप शुभ आणि प्रभावी मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचं हे गोचर ११ मे रोजी होईल आणि २५ मे पर्यंत तो याच नक्षत्रात राहील. त्यानंतर तो रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल.

हे गोचर ३ राशींसाठी खूपच शुभ मानलं जात आहे. ‘या’ राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.

सूर्याचं कृतिका नक्षत्रात गोचर कसं असेल?

सूर्याचं कृतिका नक्षत्रात प्रवेश खूप शुभ राहील. या काळात सूर्याची शक्ती वाढेल, त्यामुळे अडकलेली सरकारी कामे पूर्ण होऊ लागतील. तसेच व्यवसायात नफा मिळेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

या’ ३ राशींची चमकेल नशीब

मेष राशी (Aries May Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा गोचर खूपच चांगला ठरेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कमाईत मोठी वाढ होईल. नवीन काम सुरू करू शकता. व्यवसायही चांगला वाढेल.

सिंह राशी (Leo May Horoscope)

सूर्याचा हा गोचर सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत करेल. उत्पन्न वाढेल. व्यवसाय आणि नोकरीत चांगल्या संधी मिळतील. एखाद्या कामात मोठे यश मिळू शकते. बँक बॅलन्स वाढेल. परदेशात नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius May Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा गोचर भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरेल. अडकलेले प्रोजेक्ट्स पुन्हा सुरू होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत राहील. बरेच दिवस अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत हवे तसे यश मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)