May Numerology Prediction: मे २०२६ मध्ये काही मूलांक असलेल्या लोकांनी थोडं सावध राहण्याची गरज आहे. पुढील ३० दिवसांत या लोकांना पैशांचं नुकसान, आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता आहे. तसेच चुकीचे निर्णय घेतल्यामुळेही नुकसान होऊ शकतं. तुमचा मूलांक यामध्ये येतो का ते पाहा.

असा काढा तुमचा मूलांक

मूलांक काढण्यासाठी आपल्या जन्मतारखेतील अंकांची बेरीज करा. उदाहरणार्थ, तुमची जन्मतारीख ३० असेल तर तुमचा मूलांक ३ (३+०=३) होतो. अंकशास्त्रानुसार मे महिन्यात मूलांक ३, ७ आणि ९ असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

मूलांक ३ : चुकीचे निर्णय ठरतील महागात

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक ३ असतो. मे महिन्यात या लोकांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे करिअर असो किंवा पैशांचे व्यवहार, घाई करू नका आणि नीट विचार करून निर्णय घ्या. मानहानी होण्याचीही शक्यता आहे.

काय करावे: मोठे निर्णय घेताना तज्ञ किंवा कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या.

मूलांक ७ : डोळे बंद करून विश्वास ठेवू नका

ज्या लोकांचा जन्म ७, १६ किंवा २५ तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक ७ असतो. मे महिन्यात खूप भावनिक होऊ नका. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, नाहीतर फसवणूक होऊ शकते. पैशांचे व्यवहार करताना विशेष काळजी घ्या.

काय करावे: नीट पाहून-समजूनच कोणावर विश्वास ठेवा.

मूलांक ९ : रागामुळे होईल नुकसान

९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. मे २०२६ मध्ये या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं. नाहीतर नातेसंबंध बिघडू शकतात आणि नुकसानही होऊ शकतं. याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

काय करावे: शांत राहण्याचा प्रयत्न करा.

जर तुमचा मूलांक यापैकी कोणताही असेल, तर सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या, त्यामुळे नुकसान टाळता येईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)