३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजून ५४ मिनिटांनी बुद्धी, विचारशक्ती आणि संवादाचा कारक असलेला बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनीची ही रास आधीच राहूच्या प्रभावाखाली असल्याने बुध–राहू युती तयार होत आहे. वैदिक ज्योतिषात बुध आणि राहू यांना मित्रत्वाचे ग्रह मानले जाते. त्यामुळे हा गोचर केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे, तर देश-दुनियेतील तांत्रिक, आर्थिक आणि विचारविश्वावरही ठळक परिणाम घडवणारा ठरू शकतो.
ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धिमत्ता, विश्लेषणशक्ती, शिक्षण, संवाद, लेखन, व्यापार आणि तंत्रज्ञानाचा प्रतिनिधी मानला जातो. राहू नव्या कल्पना, अचानक बदल, अनपेक्षित यश, तंत्रज्ञान, राजकारण आणि झपाट्याने होणाऱ्या आर्थिक घडामोडींशी जोडला जातो. या दोघांच्या युतीमुळे काही राशींना निर्णयक्षमतेत वाढ, संधी ओळखण्याची दृष्टी आणि स्मार्ट मार्गाने प्रगती करण्याची क्षमता मिळू शकते. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारे केले आहे.
मेष राशी : उत्पन्न आणि ओळखींचा विस्तार (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी हा बुध गोचर विशेष परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. कुंभ रास ही तुमच्या एकादश भावाशी संबंधित असल्याने उत्पन्नवाढीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. नवी ओळख, मित्रपरिवाराचा विस्तार आणि सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठा वाढताना दिसू शकते. परदेशाशी संबंधित व्यवहार, ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. योग्य रणनीतीने केलेला व्यवसाय किंवा गुंतवणूक दीर्घकालीन फायद्याची ठरू शकते.
मिथुन राशी : भाग्य आणि ज्ञानाचा संगम (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचा कुंभ प्रवेश अत्यंत लाभदायक मानला जातो. भाग्याची साथ मिळण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. शिक्षण, संशोधन आणि बौद्धिक क्षेत्रात काम करणार्यांना प्रगतीच्या संधी मिळू शकतात. परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासातून अनुभव आणि लाभ दोन्ही मिळू शकतात. अध्यात्माकडे ओढ वाढेल, मात्र अंधश्रद्धेपेक्षा विवेकाला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती राहील. वडीलधारी व्यक्ती, गुरु किंवा मार्गदर्शकांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल.
मकर राशी : धन आणि स्थैर्याचा योग (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी हा गोचर आर्थिक दृष्टीने निर्णायक ठरू शकतो. बुध तुमच्या धन भावात भ्रमण करणार असल्याने अचानक धनलाभ, अडकलेले पैसे मिळणे किंवा नव्या कल्पनांतून उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. नोकरी बरोबरच व्यवसायातही नव्या संधी निर्माण होऊ शकतात. एकाग्रता आणि विचारशक्ती वाढल्याने बचत, गुंतवणूक आणि भविष्यनियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील आणि मानसिक समाधान मिळेल.
बुध–राहू युतीचा हा काळ केवळ आर्थिक लाभापुरता मर्यादित नसून विचार, संवाद आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांत नवे प्रयोग आणि बदल घडवणारा ठरू शकतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेणाऱ्यांसाठी हा काळ संधींचा ठेवा ठरू शकतो.

