Budh Gochar In Ashlesha Nakshatra August 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह बुद्धी, व्यापार आणि वाणीचे कारक आहे. बुधच्या राशीच्या नक्षत्रामध्ये गोचर करण्यामुळे १२ राशीच्या लोकांवर चांगला प्रभाव पडू शकतो. १६ ऑगस्टला २०२६ रोजी रविवारी पहाटे २.१९ वाजता वाजता बुध आपल्या अश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. या नक्षत्रामध्ये २२ ऑगस्टपर्यंत बुध विराजमान असेल. बुधाच्या या गोचरामुळे ४ राशींच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. गुप्त शत्रूंचा विनाश होऊ शकतो. पैशासंबंधित समस्यांचा अंत होऊ शकतो.
मेष राशी (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचे आपल्याच नक्षत्रात गोचर करणे अत्यंत शुभ ठरू शकते. गुप्त शत्रूंचा विनाश होऊ शकतो. कोणत्याही गुंतवणुकीमधून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. मोठे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढू शकतो. जुन्या मित्रांसोबतचे मतभेद दूर होऊ शकतात.
मिथुन राशी (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांना बुधाचे हे गोचर सकारात्मक फळ देणारा ठरू शकतो. मोठे प्रोजेक्ट मिळवण्यात यश मिळेल. जुन्या गुंणतवणूकीमधून चांगला लाभ मिळू शकतो. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबाची साथ मिळू शकते. तुमची वाणी आधीपेक्षा मधुर होईल.
कन्या राशी (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र गोचर शानदार ठरू शकते. विदेशात नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. अनेक मार्गांनी पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. समाजात सन्मान वाढू शकतो. कुटुंबात चांगले वातावरण राहील.
तूळ राशी (Libra )
तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे अश्लेषा नक्षत्रात गोचर करणे अत्यंत शुभ ठरू शकते. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल आणि आर्थिक स्थिती खूप सुधारेल. व्यवसायामध्ये लाभ होण्याची संधी आहे. नवीन काम सुरु करण्याची संधी मिळू शकते. जातकांची सक्रियता वाढेल.
