Budh Nakshatra Gochar 2026 Impact on Zodiac Signs: १५ फेब्रुवारीपासून १० मार्चपर्यंत बुध ग्रह गुरूच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रात भ्रमण करत आहे. बुध हा बुद्धिमत्ता, संवादकौशल्य व व्यापार यांचा कारक मानला जातो; तर गुरू ज्ञान, विस्तार व संपन्नता यांचा अधिपती समजला जातो. अशा वेळी बुधाचा गुरूच्या नक्षत्रात प्रवेश काही राशींच्या लोकांसाठी उत्सुकता वाढवणारा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, या काळात शिक्षण, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये काही राशींच्या लोकांना अनुकूल शक्यता निर्माण होऊ शकतात. मात्र, हे सर्व ग्रहस्थितीवर आधारित संकेत असून, प्रत्यक्ष परिणाम व्यक्तिनिहाय वेगवेगळे असू शकतात. चला जाणून घेऊया त्या ३ राशींविषयी सविस्तर…

वृषभ

या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना करिअर क्षेत्रात काही सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्यांची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळू शकते किंवा नवीन संधींबाबत चर्चा सुरू होऊ शकते. काही जणांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता; तर काहींना सध्याच्या नोकरीत पदोन्नती किंवा मान-सन्मान मिळू शकतो.

आर्थिकदृष्ट्या पाहता, धनलाभ होऊ शकतो, उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना योग्य सल्ला किंवा भागीदारीची संधी मिळू शकते.

शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. परीक्षांमध्ये यश, प्रोजेक्ट्समध्ये प्रशंसा किंवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अनुकूल निकाल मिळू शकतो. कुटुंबातील वातावरण सुधारू शकते आणि आरोग्याबाबतही काही सकारात्मक बदल जाणवू शकतात.

तूळ

या काळात तूळ राशीच्या व्यक्तींचा सर्जनशीलतेसह आत्मविश्वास वाढू शकतो. तुमच्या अनुभवाचा योग्य वापर करून, तुम्ही कार्यक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकता. अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच काहींना पदोन्नती किंवा नवीन प्रोजेक्टची संधी मिळू शकते.

उच्च शिक्षणासाठी परदेशी किंवा घरापासून दूर जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी अनुकूल संकेत दिसू शकतात. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि प्राध्यापक किंवा मार्गदर्शकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो.

आर्थिक बाबतीत, नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात, गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्येही सौम्यता वाढू शकते. सामाजिक वर्तुळात मान-सन्मान वाढण्याचे संकेत आहेत.

मकर

हा काळ मकर राशीच्या व्यक्तींसाठीही संवादकौशल्य वाढवणारा ठरू शकतो. तुमच्या बोलण्यात गोडवा आणि प्रभाव दिसू शकतो, ज्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कल्पनांना मान्यता मिळू शकते.

विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल मानला जातो. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा शैक्षणिक प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना नवीन नोकरीची संधी, तर व्यावसायिकांना नफा वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित केल्यास पुढील काळासाठी स्थैर्य निर्माण होऊ शकते. कुटुंबासोबत भविष्यासंदर्भात योजना आखण्याची संधी मिळू शकते. आरोग्य सुधारण्यासाठी घेतलेले प्रयत्नही फलदायी ठरू शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)