Mercury Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार काही ठरावीक काळानंतर प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन होते. नवग्रहातील काही ग्रह सौम्य गतीने तर काही ग्रह जलद गतीने राशी परिवर्तन करतात. चंद्र हा सर्वात वेगाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणारा ग्रह आहे. चंद्रानंतर बुध ग्रह सर्वात जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. येत्या काळात बुध ग्रह दोन वेळा राशीपरिवर्तन करणार आहे. १० ऑक्टोबर रोजी बुध तूळ राशीत प्रवेश करणार असून २९ ऑक्टोबर रोजी तो वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. एकाच महिन्यात बुध दोन वेळा राशी परिवर्तन करणार असल्याने काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल. 'या' तीन राशींना मिळणार पैसा, प्रेम, मानसन्मान तूळ बुध ग्रहाचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींना भाग्यदायी ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. तुमचे व्यक्तित्व सुधारेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, मन प्रसन्न राहील. मकर मकर राशीच्या व्यक्तींनाही बुधाच्या राशी परिवर्तनामुळे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. हेही वाचा: २८ नोव्हेंबरपासून पडणार पैशांचा पाऊस; गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ कुंभ बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल आणि कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल (टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)