Budh Vakri 2024: नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला एक महिना लागतो. नवग्रहांमध्ये बुधाचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, शिक्षण, ज्ञान, बुद्धी, वाणी, प्रतिभा इत्यादींचा कारक ग्रह आहे. सध्या बुध मार्गी होत वृषभ राशीत विराजमान आहेत आणि येत्या आॅगस्ट महिन्यात बुध मार्गी अवस्थेतून वक्री अवस्थेत येतील. २८ आॅगस्टपर्यंत बुधदेव वक्री चाल चालतील त्यामुळे बुधाच्या या चालीचा काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींचे भाग्य बुधाच्या या स्थितीमुळे चमकेल…

‘या’ राशींना भाग्योदयाचे प्रबळ योग?

कर्क राशी

बुधदेवाचे वक्री होणे कर्क राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. वेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यावेळी भरपूर नफा मिळू शकतो. निर्यात आणि आयातीच्या कामात फायदा होऊ शकतो.  या राशीच्या लोकांचा पैसा बराच काळ अडकला असेल तर तो परत मिळण्याची शक्यता असते. 

(हे ही वाचा: १२ महिन्यांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? सूर्य-शुक्रदेवाच्या कृपेने मिळू शकतो प्रचंड पैसा)

सिंह राशी

बुधदेवाचे वक्री होणे सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरु शकते. नोकरदार लोक जे नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही यावेळी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर यावेळी तुमचे स्वतःचे काम सुरू होऊ शकते.

धनु राशी

बुधदेवाचे वक्री होणे धनु राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. बुधदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)