बुध २० दिवस सिंह राशीत राहील; या काळात 'या' चार राशींना त्यांच्या करिअरमध्ये पूर्ण लाभ मिळेल| Mercury will remain in Leo for 20 days; During this period 'these' four signs will get full benefit in their career | Loksatta

बुध २० दिवस सिंह राशीत राहील; या काळात ‘या’ चार राशींना त्यांच्या करिअरमध्ये पूर्ण लाभ मिळेल

बुध २१ ऑगस्टपर्यंत सिंह राशीत बसून राहणार आहे. त्यानंतर तो कन्या राशीत प्रवेश करेल.

बुध २० दिवस सिंह राशीत राहील; या काळात ‘या’ चार राशींना त्यांच्या करिअरमध्ये पूर्ण लाभ मिळेल
बुध २० दिवस सिंह राशीत राहील(फोटो: संग्रहित फोटो)

Budh Rashi Parivartan August 2022: बुध, बुद्धीची देवता,१ ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश केला आहे. जिथे तो २१ ऑगस्टपर्यंत बसून राहणार आहे. त्यानंतर तो कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या ही बुधाची राशी आहे. याशिवाय मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा ग्रह कोणत्याही राशीत जवळपास २३ दिवस राहतो. कुंडलीत या ग्रहाची मजबूत स्थिती माणसाला बुद्धिमान आणि बोलण्यात पारंगत बनवते. सिंह राशीत बुधचे संक्रमणामूळे काही राशींचे नशीब उजळणार आहे. तर जाणून घ्या या चार राशींविषयी.

मेष

या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रमोशनची जोरदार शक्यता दिसत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल दिसत आहे. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल. तुमचे संवाद कौशल्य वाढेल. तुम्ही तुमच्या बोलण्याने इतरांना प्रभावित करू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

( हे ही वाचा: Budh Gochar 2022: २१ ऑगस्टपर्यंत ‘या’ राशींनी अत्यंत सतर्क राहावे; बुध संक्रमणामुळे आरोग्य आणि मालमत्तेवर होईल वाईट परिणाम)

वृषभ

तुमचे संवाद कौशल्य सुधारेल. जर तुम्ही काही नवीन करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कामात यश मिळेल. हे २० दिवस करिअरच्या दृष्टीने उत्तम ठरणार आहेत. कामाच्या ठिकाणी प्रत्येक कामात बॉसचे पूर्ण सहकार्य असेल. तुम्हीही गुंतवणूक करू शकता. करिअरला नवी दिशा मिळेल.

मिथुन

या काळात तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येईल. तुमच्या प्रयत्नात यश मिळेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. स्वत:ची कामे करणाऱ्यांनाही लाभ होताना दिसत आहे. पैसे गुंतवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

( हे ही वाचा: Mangal Gochar 2022: १० ऑगस्टपासून या राशींचे चमकेल भाग्य; मंगळाच्या कृपेने होईल धनलाभ)

तूळ

व्यावसायिक लोकांसाठी हा काळ चांगला राहील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगले काम कराल. या काळात तुम्ही नवीन व्यावसायिक मित्रही बनवाल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असतील.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Raksha Bandhan 2022: राखी बांधताना तीन गाठी बांधण्याचे महत्त्व काय? यंदाच्या रक्षाबंधनाला ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

संबंधित बातम्या

२९ डिसेंबरपासून ‘या’ ३ राशी होऊ शकतात श्रीमंत; शनिच्या राशीत प्रवेश करून शुक्र देणार अपार धनलाभाची संधी
२०२३ मध्ये राहू ग्रह उलट दिशेने फिरणार; ‘या’ ३ राशीच्या धनात प्रचंड वाढ होण्याची शक्यता
३१ डिसेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बुध ग्रह देणार बक्कळ पैसा कमवण्याची संधी
२०२३ मध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड धनलाभाची संधी; ग्रहांचा राजा सूर्य देवाची राहील विशेष कृपा
१६ जानेवारीपर्यंत ‘या’ ३ राशींवर असेल शनिदेवाची वाकडी नजर; होऊ शकते प्रचंड धनहानी! वेळीच व्हा सावध

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“बेळगावात आला तर कठोर…”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इशारा
स्कुटीवरील नियंत्रण सुटले अन् ती थेट गेटलाच लटकली; नेटकरी म्हणाले ‘पापा की परी…’
“त्यात आक्षेप घेण्यासारखं काय?” महेश मांजरेकरांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरचे उत्तर
चारित्र्याच्या संशयातून अभियंत्याकडून पत्नीचा खून; पुण्यातील हडपसर भागातील घटना
आंतरधर्मीय जोडप्यासह नऊ जणांवर ‘हरियाणा धर्मांतरविरोधी कायद्या’अंतर्गत गुन्हा दाखल