Aries Next Month Horoscope : राशीचक्रातील पहिली रास म्हणजे मेष. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा ग्रह भरपूर ऊर्जा देणारा असा तप्त ग्रह आहे. त्यामुळे तुमच्यात देखील खूप ऊर्जा आणि उत्साह दिसून येतो. वागण्या- बोलण्यातही तुम्ही तेवढेच उत्साही असतात. संथपणाने कामे करणे, रेंगाळणे तुम्हाला अजिबात पटत नाही. इतरांनीही रेंगाळत कामे केलेली तुम्हाला बिलकूल आवडत नाही. धाडसी वृत्ती असल्याने नवनवीन आव्हाने स्वीकारणे तुम्हाला आवडते. पण किंबहुना त्याच त्याच चाकोरीबद्ध जगण्याचा तुम्हाला कंटाळा येतो.

मनातील गोष्टी स्पष्टपणे सांगून मोकळी होणारी तुमची रास तडजोड करायला सहसा तयार नसते. त्यामुळेच हवे ते मिळवण्याची जिद्द तुमच्यात असते. काही वेळा आरंभशूरपणा तुमच्यात दिसून येतो. कामाची सुरुवात अगदी झोकात करता. पण, सातत्य टिकणे कठीण असले तरीही ध्येयाने पछाडलेल्या तुम्ही सतत झंझावात असतात. नावीन्यपूर्ण गोष्टींकडे तुमचा कल असतो. त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही आरंभशूर असतात. तर अशा या मेष राशीला येणारा ऑक्टोबर महिना कसा जाईल चला जाणून घेऊयात.

मेष राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशिभविष्य

पितृ पंधरवड्यात सामाजिक कार्यातून मानसिक समाधान मिळेल. १२ ऑक्टोबरला होणारी घटस्थापना आर्थिक लाभ देईल; तर दसरा आनंदासोबत प्रगतीचा मार्ग दाखवेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. अनेक प्रलोभनांमुळे आपले अभ्यासवरील लक्ष विचलित होईल. नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करून दाखविण्याची गरज भासेल. विवाह जुळण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी ठरतील.

विवाहितांना उत्तम दाम्पत्यसुख मिळेल. जमिनीचे व्यवहार सावधगिरीने करा. नातेवाइकांचा रोष पत्करावा लागेल. आपली बाजू ठामपणे मांडाल. कुटुंबासह प्रवास करण्याचा आनंददायी योग येईल. व्यायाम, आहार व विश्रांती या त्रिसूत्रीचा सातत्याने अवलंब केल्यास आरोग्य उत्तम राहील. ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करणार आहे.