Daily Rashi Bhavishya : १५ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी शनिवारी रात्री ११ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहील. तसेच धृती योग रविवारी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच आज राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर आज तुमच्या राशीचा दिवस आनंदात जाणार की दुःखात हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

१५ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today) :

मेष:- मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. फार काळजी करत राहू नका. प्रवासात काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची मदत होईल.

वृषभ:- उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील. स्त्रियांशी मैत्री वाढेल. आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील. सुखासक्तपणा जाणवेल.

मिथुन:- कलेतून नावलौकिक वाढेल. कामातून अपेक्षित लाभ मिळवता येईल. कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण लाभेल. घरातील साफसफाई काढाल. नीटनेटकेपणाकडे अधिक लक्ष द्याल.

कर्क:- काही अपेक्षा पूर्ण होण्यास वेळ द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. अपयशाने खचून जाऊ नये. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. अतिविचार करू नका.

सिंह:- जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. तिरसटपणे वागू नये. बौद्धिक चुणूक दाखवता येईल. व्यापारी वर्गाला नवीन आशादायी वातावरण लाभेल. नवीन लोक संपर्कात येतील.

कन्या:- कफविकार बळावू शकतात. कामाच्या ठिकाणी समाधान शोधाल. वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या विश्वासास खरे उतरावे.

तूळ:- तुमची इच्छाशक्ति वाढीस लागेल. साहसाने कामे हाती घ्याल. लिखाणाला बळ मिळेल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. तुमच्यातील सज्जनता दिसून येईल.

वृश्चिक:- सांपत्तिक स्थिती सुधारेल. खर्च वाढू शकतो. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.

धनू:- प्रचंड आशावादी दृष्टिकोन ठेवाल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. स्वत:च मान राखण्याचा प्रयत्न कराल. दिलदारपणे वागाल.

मकर:- सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. पारमार्थिक उन्नती साधता येईल. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. सामाजिक सेवेत हातभार लावावा.

कुंभ:- मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. आर्थिक लाभाकडे बारीक लक्ष ठेवावे. काटकसर करण्याकडे कल राहील. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवाल. आवडी-निवडीवर भर द्याल.

मीन:- आवडत्या गोष्टी कराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. स्व‍च्छंदीपणे वागाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mesh to meen which zodiac signs get shani maharaj blessing read 15 february 2025 horoscope in marathi asp