19th May Panchang & Rashi Bhavishya: १९ मे २०२४ च्या दिवशी वैशाख शुक्ल पक्षातील उदया तिथीला एकादशी आहे. रविवारच्या दिवशी दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असणार आहे व त्यानंतर द्वादशी तिथी सुरु होईल. १९ मे च्या सकाळी ११ वाजून २५ मिनिटांपर्यंत वज्र योग असणार आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजून १७ मिनिटांपर्यंत हस्त नक्षत्र जागृत असणार आहे. १९ मे २०२४ ला मोहिनी एकादशी असणार आहे. आज ग्रहमानानुसार काही राशींना विठ्ठल रुख्मिणी लाभ देऊ करणार आहेत. मेष ते मीनपैकी कोणत्या राशींना कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-उत्तम वाहन सौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. झोपेची तक्रार दूर होईल. घरातील वातावरणात प्रसन्नता राहील. आवडी-निवडी बाबत ठाम राहाल.

वृषभ:-जोमाने कामे पूर्ण कराल. प्रवासाची आवड अंशत: पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. वैचारिक दर्जा सुधारता येईल. मानसिक चांचल्य जाणवेल.

मिथुन:-फक्त स्वत:चा विचार करून चालणार नाही. नवीन गुंतवणूक कराल. सेवेचे महत्व लक्षात घ्यावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हावे. अघळपघळ गप्पा मारल्या जातील.

कर्क:-मनातील भलते-सलते विचार बाजूला सारावेत. आनंदी दृष्टीने वागावे. ध्यानधारणा करावी लागेल. मन:शांती महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. उष्णतेचा त्रास जाणवेल.

सिंह:-योग्य संधीची वाट पहावी. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. तुमच्या हातून दान धर्म केला जाईल. चोरांपासून सावध रहा. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात.

कन्या:-उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्गाच्या आकांक्षा पूर्ण होतील. कमिशन मधून मिळणार्‍या लाभाचा फायदा घ्या. वरिष्ठांची नाराजी दूर करावी. अती अपेक्षा ठेवू नका.

तूळ:-कामात वडि‍लांची मदत होईल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. नसते धाडस अंगाशी येवू शकते. कामातील चिकाटी सोडू नये. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

वृश्चिक:-योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. एखादी नवीन संधी चालून येवू शकते. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न फार चिघळू देवू नका. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी.

धनू:-जुन्या कामातून लाभ होईल. कमी श्रमात कामे केले जातील. जुगार खेळताना सावध रहा. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. हाता पायाला किरकोळ इजा संभवते.

मकर:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. शांत व संयमी विचार करा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. काटकसरीवर भर द्यावा लागेल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.

कुंभ:-घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. नातेवाईकांची योग्य वेळी मदत मिळेल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

हे ही वाचा<< शनी महाराज ‘या’ दिवशी घर सोडणार; २०२७ पर्यंत गुरुकडे राहून ‘या’ ३ राशींना देणार अपार संपत्ती; यश पायाशी घालेल लोटांगण

मीन:-बुद्धी कौशल्याच्या जोरावर कामे घ्यावीत. प्रेम सौख्यात वाढ होईल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जुगाराची आवड जोपासली जाईल. अधिकाराची जाणीव ठेवून वागा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohini ekadashi 19 may panchang lakshmi narayan vithhal to bless mesh to meen rashi daily marathi rashi bhavishya money love power svs
First published on: 18-05-2024 at 19:17 IST