Mohini Ekadashi 2024 : १९ मे ला मोहिनी एकादशी आहे. मोहिनी एकादशीच्या दिवशी १२ वर्षानंतर अनेक शुभ योगांना मिळून दुर्लभ संयोग तयार होत आहे. या वर्षी १९ मे ला मोहिनी एकादशीच्या दिवशी द्विपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धि योग, शुक्रादित्य योग, राजभंग योग आणि लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे, या सर्व योगांचा फायदा राशीचक्रातील पाच राशींवर होणार आहे. पाच राशींना याचा चांगला लाभ झालेला दिसून येईल. जाणून घ्या त्या पाच राशी कोणत्या? ( Mohini ekadashi : a shubh sanyog will be lucky for zodiac signs)

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना १९ मे रोजी मे रोजी मोहिनी एकादशीचा मोठा लाभ होऊ शकतो. थांबविलेले काम पूर्ण होतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे त्यांच्यावर श्रीहरीची कृपा दिसून येईल आणि त्यांना भरपूर यश मिळेल.

कर्क राशी

मोहिनी एकादशीच्या दिवशी निर्माण होणाऱ्या शुभ योगांचा संयोगामुळे कर्क राशीच्या आयुष्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. प्रत्येक कामात यश मिळेल. या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. या राशीचे लोक खर्चावर नियंत्रण ठेवेल तर त्यांचा चांगली आर्थिक बचत करता येईल.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी मोहिनी एकादशी फायद्याची ठरू शकते. या लोकांना कार्यक्षेत्रात यश मिळेल. याशिवाय या राशीच्या लोकांना चांगली धनप्राप्ती होऊ शकते ज्यामुळे त्यांना बक्कळ पैसा मिळू शकतो. हे लोक शत्रुंचा सामना करण्यास उत्सूक राहील. या लोकांचे खूप दिवसांपासून अडकलेले काम मार्गी लागतील.

हेही वाचा : शनी महाराज ‘या’ दिवशी घर सोडणार; २०२७ पर्यंत गुरुकडे राहून ‘या’ ३ राशींना देणार अपार संपत्ती; यश पायाशी घालेल लोटांगण

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांची पदोन्नती, पगारवाढ होऊ शकते. मोहिनी एकादशीला निर्माण होणारे शुभ संयोग तुळ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आतापर्यंत या लोकांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना फळ मिळेल. गुंतवणूकीसाठी हा चांगला काळ आहे.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांवर विष्णु आणि लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येईल. या लोकांना कोणतीही मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. या लोकांचा खर्च वाढू शकतो आणि त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी सकारात्मकता जाणवेल आणि चांगले परिणाम दिसून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)