Rashi Bhavishya In Marathi, 8 May 2025: ८ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. एकादशी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर एकादशी सुरु होईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र रात्री ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच आज हर्षण योग जुळून येईल. राहू काळ १:३० वाजता सुरु होईल ते ३ पर्यंत असणार आहे. तसेच आज मोहिनी एकादशी असणार आहे. मोहिनी एकादशीला तुम्हाला लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद लाभण्याची चिन्हे दिसतायत का जाणून घेऊया…

८ मे पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya In Marathi, 8 May 2025)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

मनाची चंचलता वाढू देऊ नका. कामाच्या ठिकाणी अधिकार वाणीने वागाल. घरगुती वातावरण चांगले राहील. व्यावसायिक चिंता मिटू शकतील. व्यावसायिक प्रगती साधता येईल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

अधिकार वाणीने बोलाल. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आपल्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग करता येईल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

मुलांची काळजी लागून राहील. उधारीची कामे टाळावीत. अचानक धनलाभ संभवतो. ठरवलेली कामे सुरळीत पार पडतील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नवीन मित्र जोडाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

मनातील शंका काढून टाकाव्यात. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. भागीदाराशी मतभेद वाढवू नका.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

हातातील कामावर अधिक लक्ष ठेवावे. छुप्या शत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवावे. नातेवाईकांना मदत कराल. भांडणात सहभाग घेऊ नका. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था टाळावी. मुलांच्या स्वतंत्र विचारांचा रोख जाणून घ्यावा. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नवीन कामात अधिक लक्ष घालावे. पत्नीशी मतभेद वाढवू नका. भागीदारीत नवीन योजना आखाव्यात.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathii)

अधिकाराचा योग्य ठिकाणीच वापर करावा. कामातून समाधान शोधावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. अती साहस करायला जाऊ नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

नातेवाईकांशी मतभेद वाढू शकतात. काही बदल अनपेक्षित असू शकतात. इच्छा नसतांना प्रवास करावा लागू शकतो. मनातील नैराश्य दूर सारावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

चटकन रागवू नका. पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो. निराशाजनक विचारांना मनात थारा देऊ नका. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. कौटुंबिक वातावरणात रमून जाल.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक शंकांना मनात थारा देऊ नका. वादविवादात सहभागी होऊ नका. नवीन कामे अंगावर पडतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर