16th September Rashi Bhavishya & Panchang : आज १६ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी सोमवारी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत राहील. तसेच रात्री ११ वाजून ४२ मिनिटांपर्यंत सुकर्म योग जुळून येईल, त्यानंतर धृती योग सुरु होईल. सोमवारी संध्याकाळी ४ वाजून ३३ पर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. तर आज राहुकाळ पहाटे ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते पहाटे ९ वाजेपर्यंत असेल. याशिवाय सायंकाळी ७ वाजून ४३ मिनिटांनी सूर्याचा कन्या राशीत प्रवेश होईल. सूर्याचा कन्या राशीत प्रवेश तुमच्या राशीसाठी कसा लाभदायक ठरेल हे आपण जाणून घेऊया…

१६ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. नोकरीत मान मिळेल. नियोजित कामात प्रयत्नशील राहावे. जुनी येणी प्राप्त होतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

18th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१८ सप्टेंबर पंचांग: पंचांगानुसार आज कोणाच्या कुंडलीत होणार उलथापालथ? आरोग्य तर धन-संपत्तीकडे द्यावं लागणार लक्ष; वाचा तुमचे राशीभविष्य
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल घडवणार? यश, समृद्धी, कीर्तीचा पाऊस पाडणार; वाचा तुमचे भविष्य
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार प्रचंड लाभ; वाचा सूर्याच्या हस्त नक्षत्रात प्रवेशाने तुमच्या कुंडलीत काय बदल होणार
20th September Rashi Bhavishya in marathi
२० सप्टेंबर पंचांग: अश्विनी नक्षत्रात कोणत्या राशींचे प्रश्न लागणार मार्गी? प्रेम, पद, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा तुमचे भविष्य
23rd September Rashi Bhavishya & Panchang
२३ सप्टेंबर पंचांग: तुमच्या कुंडलीतील छोटासा बदल लाभदायक ठरणार; वाचा मेष ते मीनच्या आठवड्याची कशी सुरुवात होणार
24th September Rashi Bhavishya & Panchang
२४ सप्टेंबर पंचांग: गोडीगुलाबीनं जाईल दिवस, पण ‘या’ राशींनी रहा सावध; वाचा तुमच्या कुंडलीत काय नवं घडणार?
13th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१३ सप्टेंबर पंचांग: मनासारखे यश, अनपेक्षित लाभ; सौभाग्य योगात तुम्हाला कोणत्या रूपात लाभणार लक्ष्मीची कृपा? वाचा १२ राशींचे भविष्य

वृषभ:- कलेत प्राविण्य दाखवाल. व्यवसायात खबरदारी घ्यावी. कामात धांदल टाळावी. एखाद्यावर अति विश्वास टाळावा. सर गोष्टींचा आढावा घ्यावा.

मिथुन:- जोडीदाराकडून फायदा होईल. लहान प्रवास घडतील. करियर बदलला काळ अनुकूल. कामासंदर्भात तज्ञ व ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. जोडीदाराचे मत उपयुक्त ठरेल.

कर्क:- भागीदारीतील निर्णय धीराने घ्या. तडकाफडकी कोणतेही काम करू नका. नवीन प्रकल्प लक्ष वेधून घेईल. एकंदर परिस्थितीचा आढावा घ्यावा. सारासार विचार करून निर्णय घ्यावा.

सिंह:- तुमच्या कालगुणांना वाव मिळेल. ओळखीच्या लोकात लोकप्रिय व्हाल. तुमचा जनसंपर्क वाढेल. अति उत्साहात निर्णय घेऊ नका. कामाची पूर्व तयारी करावी लागेल.

कन्या:- घरात धार्मिक कार्य घडेल. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. मानसिक ताण वाढू देऊ नका. जोडीदारापासून गोष्टी लपवू नका. प्रेमातील व्यक्तींनी सावधगिरी बाळगावी.

तूळ:- घरासाठी पैसा खर्च कराल. मित्रांचा प्रभाव राहील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत. बोलण्यातून इतरांवर प्रभाव पाडाल.

वृश्चिक:- जुनी येणी वसूल होतील. मानसिक शांतता जपावी. मनातील इच्छा प्रबळ राहील. काही मूलभूत गोष्टीत परिवर्तन करावे लागेल. कौटुंबिक जबाबदारी प्राधान्याने पार पाडाल.

धनू:- सामाजिक मान वाढेल. घरातील प्रश्न संयमाने सोडवा. भावंडांशी चर्चा करावी. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारण्याची प्रबळ इच्छा होईल.

मकर:- व्यायामाची संगत सोडू नका. कौटुंबिक कामात बराच वेळ घालवाल. शारीरिक अस्वस्थता कमी होईल. मुलांच्या इच्छा जाणून घ्याव्यात. खरेदीचे योग आहेत.

कुंभ:- भावनिक गुंतागुंतीत अडकू नका. आपले कर्तृत्व दाखवून द्या. मनोरंजनात वेळ घालवा. कठोर प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर रहा. जोडीदाराची साथ मिळेल.

मीन:- अनाठायी खर्च वाढू शकतो. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. मन काहीसे विचलीत राहील. क्रोधाच्या आहारी जाऊ नका. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर