26 February Horoscope Marathi: आज २६ फेब्रुवारी : सोमवार, अनेकांसाठी शुभ ठरणार आहे. कुणाला होणार धनलाभ, कुणाला लाभेल कौटुंबिक स्वास्थ्य पाहा. आज तुमच्या कुंडलीत नेमके काय ते जाणून घ्या.

मेष:-लहान प्रवास घडेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. सद्गुणांचा विकास करता येईल.

Good Friday: 29th March Panchang & Rashi Bhavishya
२९ मार्च पंचांग: कर्क, मीनसह ‘या’ राशींच्या लोकांचं आज चारचौघात होईल कौतुक; शुक्रवारी कुणाला लाभेल वैभव
Sagittarius April Horoscope
Sagittarius : धनु राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात घ्यावी विशेष काळजी; कशी असेल त्यांची आर्थिक स्थिती अन् लव्ह रिलेशन? जाणून घ्या
Today's Horoscope 19 March 2024 in Marathi
शनी झाले जागृत! १९ मार्चचा मंगळवार मेष ते मीन राशींपैकी ‘या’ मंडळींना ठरेल मोदकासारखा गोड, पाहा तुमचं भविष्य
Holika Dahan Shubh Muhurta significance timing history
२४ की २५ मार्च होळी नक्की कधी? होलिका दहनासाठी ‘हा’ पावणे दोन तासांचा मुहूर्त सर्वात शुभ, पाहा नियम

वृषभ:-जोडीदाराचा वरचष्मा राहील. मतवैचित्र दर्शवू नका. कौटुंबिक वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. कोर्ट-कचेरीची कामे पुढे ढकलावीत. भागीदाराशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.

मिथुन:-प्रेमसंबंधात वाढ होईल. आर्थिक लाभाचा विचार करावा. प्रवासाचे योग येतील. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. ठाम निर्णयाची गरज भासेल.

कर्क:-आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. पचनाचे विकार संभवतात. जोडीदाराच्या मताचा पुनर्विचार करावा. भागीदारीतील धोरण नीट जाणून घ्या.

हेही वाचा : March Astrology : मार्च महिन्यात ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल, कुटूंबात नांदेल सुख समृद्धी

सिंह:-प्रेमसंबंध सुधारतील. मुलांचे कौतुक कराल. व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील. तुमची धार्मिकता वाढेल. चांगले साहित्य वाचाल.

कन्या:-कौटुंबिक स्वास्थ लाभेल. नातेवाईकांचा विरोध संभवतो. लहान-सहान कुरबुरी राहतील. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी कराल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

तूळ:-दूरच्या प्रवासाचा योग येईल. भावंडांचे प्रश्न सोडवावे लागतील. ग्रंथ वाचन कराल. यात्रा कंपनीची सवलत मिळेल. बोलतांना सारासार विचार करावा.

वृश्चिक:-रागावर नियंत्रण ठेवावे. औद्योगिक वाढीचा विचार करावा. कौटुंबिक कार्यक्रम होतील. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.

धनू:-तुमच्यातील आशावाद वाढेल. सामाजिक दर्जा सुधारता येईल. शैक्षणिक कामात प्रगती करता येईल. ऐहिक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चुणूक दाखवता येईल.

मकर:-मनातून नैराश्य दूर सारावे. कामाची धांदल राहील. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. कमिशनच्या व्यवसायातून लाभ संभवतो. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल.

कुंभ:-फार हट्टीपणा करू नका. आपले विचार उत्तम प्रकारे मांडावेत. कामात तत्परता दाखवाल. अति चिकित्सा करणे टाळावे. मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.

मीन:-कल्पनाशक्तीला चांगली भरारी मिळेल. घरी मोठ्या लोकांचा वावर राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घरातील कामात व्यग्र राहाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर