Chandra Mangal Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो, शिवाय त्यातून शुभ संयोग आणि राजयोग निर्माण होतात, ज्याचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतो. चंद्र आणि मंगळाच्या युतीने हा राजयोग निर्माण होत आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. पंचांगानुसार, चंद्र १६ मार्च २०२६ रोजी मंगळ आणि चंद्र एकत्र येऊन महालक्ष्मी रायजोग निर्माण करतील. या योगाचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर विशेष पाहायला मिळेल. या योगाच्या प्रभावाने या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यावर धन, सुख-समृद्धी आणि वैभव नांदेल.

महालक्ष्मी राजयोग ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळवणार

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरेल. या योगाच्या प्रभावाने अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील. स्पर्धा परिक्षेत मनासारखे यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल. कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल, कौतुक होईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. व्यवसायात प्रचंड वाढ होईल.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी योगामुळे खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

धनु (Dhanu Rashi)

महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव धनु राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी महालक्ष्मी राजयोग निर्माण होईल. शुभ प्रभाव अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)