Chandra Grahan 2024 : या वर्षीचे दुसरे आणि शेवटचे चंद्र ग्रहण लवकर येणार आहे. हे चंग्र ग्रहण पितृ पक्षादरम्यान लागेल. या वर्षी पितृपक्ष १७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि २ ऑक्टोबरला समाप्त होईल. या पितृपक्षामध्ये १८ सप्टेंबर रोजी सकाळी चंद्रग्रहण लागणार आहे. चंद्र ग्रहणाच्या वेळी चंद्र मीन राशीमध्ये विराजमान राहणार ज्या ठिकाणी राहु ग्रह आधीच विराजमान आहे. त्यामुळे चंद्र आणि राहुच्या युतीमुळे या ग्रहणाचा काही सकारात्मक परिणाम काही राशींवर होऊ शकतो. जाणून घेऊ या चंद्र ग्रहणाच्या वेळी कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो.

या वर्षीचे दुसरे चंद्र ग्रहण १८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी सहा वाजून ११ मिनिटांनी सुरू होणार आहे. जे सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल. या चंद्र ग्रहणाचा काळ चार तास सहा मिनिटे असणार.

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

चंद्र या राशीच्या अकराव्या स्थानावर प्रवेश करणार. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये या लोकांची प्रगती होईल. थांबलेली कामे मार्गी लागतील. अचानक धन लाभ होऊ शकतो. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळतील. तसेच मित्रांबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. कुटुंबातील लोकांचे सहकार्य लाभेल. वडीलांची संपत्ती मिळण्याचा योग दिसून येत आहे. मोठ्या भावाबरोबर या लोकांचे संबंध दृढ होईल. कुटुंबातील दीर्घकालीन समस्या दूर होऊ शकते. या लोकांना अपार धनसंपत्ती मिळेन.

हेही वाचा : ४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा

वृश्चिक राशी (Vraschik Zodiac)

वृश्चिक राशीच्या पाचव्या स्थानावर हे ग्रहण निर्माण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांची शिक्षण, करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. जर या लोकांना विदेशात जाऊन अभ्यास करायचा असेल तर त्यांना सुद्धा यश मिळू शकते. या लोकांना आई वडीलांचे सहकार्य लाभेल ज्यामुळे ते त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतील. घर आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी तुम्ही नवीन स्किल्स शिकू शकता. त्यामुळे येणाऱ्या काळा तुम्ही याचा लाभ मिळवू शकता.

कुंभ राशी (Kumbha Zodiac)

कुंभ राशीच्या दुसऱ्या स्थानावर हा ग्रहणाचा योग निर्माण होत आहे. तसेच या राशीच्या पहिल्या स्थानावर शनि विराजमान आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. त्यांच्या वाणीची त्यांची काळजी घ्यावी अन्यथा चांगली कामे बिघडू शकतात. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरच्या क्षेत्रात या लोकांना लाभ मिळू शकतो. हे लोक त्यांच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवतील. आयुष्यात अपार आनंद येऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)