Moon Aquarius Zodiac Sign : आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे, त्याचबरोबर आज चंद्राने राशी बदल देखील केला आहे. ज्योतिष शास्त्रात चंद्राच्या संक्रमणाला (Chandra Gochar) फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. खरंतर, चंद्राच्या या संक्रमणाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर थेट होतो. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. याला शनिचा शत्रू ग्रहसुद्धा मानतात. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे.

आज सकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी चंद्राने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. कुंभ राशीतील चंद्राचे हे संक्रमण काही राशींसाठी आव्हानात्मक काळ आणू शकते. वृषभ व कर्क राशीसह चार राशींना त्यांच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगण्याची, आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. पण, काही उपाय या राशींसाठी फायदेशीर ठरू शकतात.

वृषभ

चंद्राचे गोचर तुमच्या कुंडलीतील अष्टम भावात होत असल्याने तुम्हाला अचानक आर्थिक नुकसान होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण केले पाहिजे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली कामगिरी करण्यासाठी एकाग्र राहण्याची गरज आहे; योग आणि ध्यान करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कर्क

चंद्र तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि शत्रू राशीत असताना तो तुमच्या सहाव्या घरात राहील. या घरात चंद्राच्या उपस्थितीमुळे तुमचे विरोधक सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमचे आरोग्यही बिघडू शकते. म्हणून स्वतःची काळजी घ्या, आर्थिक बाबींमधील कोणताही निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो.

धनु

चंद्र तुमच्या तिसऱ्या घरात भ्रमण करणार आहे, त्यामुळे तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. आर्थिक व्यवहार सावधगिरीने हाताळा. चाळिशी ओलांडलेल्यांनीही आपल्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्ही वाईट संगतीपासून जितके दूर राहाल, तितकेच तुमच्यासाठीही चांगले राहील.

मीन

चंद्र तुमच्या बाराव्या घरात भ्रमण करणार असून तुमचे नुकसान होऊ शकते. या भ्रमणामुळे काही कारणास्तव तुमचे बचत केलेले पैसे खर्च होऊ शकतात. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आपले प्रयत्न वाढवावे लागतील. एखादी वाईट बातमी तुम्हाला त्रास देऊ शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)