Most Unpredictable People Numerology: काही लोक वरून अतिशय शांत आणि साधे दिसतात, पण त्यांच्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचार सुरू असतात. ते कधी आपला निर्णय बदलतील, पुढचे पाऊल काय टाकतील किंवा बाजी कधी उलटवून लावतील, याचा अंदाज बांधणे कोणालाही सोपे नसते. अंकशास्त्रानुसार (Numerology) काही मूलांक असे असतात, ज्यांची पर्सनालिटी प्रचंड अनप्रेडिक्टेबल आणि मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण मानली जाते.

हे लोक त्यांचे खरे विचार नेहमी लपवून ठेवतात. ते कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांच्या योजनांची कोणालाही भनक लागू देत नाहीत. यामुळेच लोक त्यांना ‘मिस्टीरियस’ किंवा ‘माइंड गेम एक्सपर्ट’ समजतात.

मूलांक ४: अचानक घेतात धक्कादायक निर्णय (कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेले लोक)

अंकशास्त्रात या मूलांकाच्या लोकांना हटके विचार करणारे मानले जाते. हे लोक प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने समजून घेतात. अनेकदा त्यांचे वर्तन इतके अनपेक्षित असते की त्यांच्या जवळच्या लोकांनाही त्यांच्या पुढच्या पावलाचा अंदाज येत नाही. त्यांच्यावर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, ते अचानक आपली दिशा बदलून सर्वांना चकित करतात.

मूलांक ५: परिस्थितीनुसार झटकन गेम बदलणारे (कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेले लोक)

या लोकांना वेगवान विचारसरणी, उत्तम संवाद कौशल्य आणि झटपट निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते. हे लोक परिस्थितीनुसार स्वतःला लगेच बदलतात. यामुळे त्यांच्या मनात नक्की काय चालले आहे, हे सामनेवाल्याला समजत नाही. ही लवचिकता त्यांना करिअरमध्ये फायदेशीर ठरती, पण भावना उघडपणे व्यक्त न केल्यामुळे नात्यांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण होऊ शकतो.

मूलांक ७: आपले विचार कधीही उघड न करणारे (कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेले लोक)

या मूलांकाचे लोक ‘डीप थिंकर्स’ (गहन विचार करणारे) असतात. बोलण्यापेक्षा गोष्टींचे निरीक्षण करण्यावर त्यांचा जास्त भर असतो. ते आपल्या योजना आणि भावना मोजक्याच लोकांसोबत शेअर करतात. ते प्रत्येक परिस्थितीचे बारकाईने विश्लेषण करतात आणि अचानक असा निर्णय घेतात की सगळे पाहतच राहतात.

मूलांक ८: शांत राहून मोठी रणनीति आखणारे (कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेले लोक)

या लोकांना प्रॅक्टिकल आणि कमालीचे स्ट्रॅटेजिक मानले जाते. हे लोक आपले प्लॅन्स गुप्तपणे तयार करतात. भावनांपेक्षा लॉजिक आणि दीर्घकालीन नियोजनावर त्यांचा जास्त विश्वास असतो. यामुळेच करिअर आणि व्यवसायात ते शांतपणे मोठी यशाची शिखरे सर करतात, पण वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या या शांत स्वभावामुळे नात्यात अंतर येऊ शकते.

असा स्वभाव असणे चुकीचे आहे का?

मानसशास्त्राच्या दृष्टीने, असे लोक भावनिकदृष्ट्या स्वतःचे रक्षण करत असतात, म्हणजेच ते आपल्या कमकुवतपणा सहज कोणासमोर येऊ देत नाहीत. कोणत्याही निर्णयावर पोहोचण्यापूर्वी ते खूप विचार करतात, त्यामुळे इतरांना ते रहस्यमयी वाटू शकतात. अशा लोकांसोबत काम करताना किंवा नात्यात राहताना संयम आणि विश्वासाची खूप गरज असते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)