Trust Issues Numerology : अंकशास्त्रामध्ये काही विशिष्ट मूलांक असलेल्या लोकांच्या स्वभावाबाबत काही रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. हे लोक कोणाच्याही बोलण्यात लवकर येत नाहीत आणि कोणतीही खात्री केल्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवत नाहीत. स्वतःचे अनुभव आणि सभोवतालची परिस्थिती समजून घेणे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते.
कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवणे सोपे असते, पण एकदा धोका मिळाल्यानंतर पुन्हा कोणाच्या जवळ जाण्यासाठी खूप वेळ जावा लागतो. काही लोक आपले जुने अनुभव कायम लक्षात ठेवतात आणि भविष्यात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक पैलूचा सखोल विचार करतात. अशीच खासियत काही विशिष्ट मूलांक असलेल्या लोकांमध्ये पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊया, कोणते आहेत ते ३ मूलांक, ज्यांचे लोक प्रत्येक पाऊल अतिशय काळजीपूर्वक उचलतात.
मूलांक ४
कोणत्याही व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे हा मूलांक ४ च्या लोकांचा स्वभाव नसतो. अंकशास्त्रानुसार या मूलांकाचे लोक खूप व्यावहारिक आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणारे मानले जातात. कोणतीही परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय हे लोक प्रतिक्रिया देत नाहीत. कोणाच्या बोलण्याने प्रभावित होण्यापेक्षा ते त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष वागणुकीवर लक्ष केंद्रित करतात
या मूलांकाचे लोक स्वतःच्या चुकांमधून आणि इतरांच्या अनुभवांमधून धडा घेतात. जर भूतकाळात कोणाच्या विश्वासाघातमुळे त्यांना नुकसान सहन करावे लागले असेल, तर भविष्यात तशी परिस्थिती टाळण्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतात. हे लोक तीच चूक पुन्हा कधीही दोहरावयाला तयार नसतात. यामुळेच कोणत्याही नवीन व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी ते त्याच्या वागणुकीची आणि हेतूची नीट परीक्षा घेतात.
मूलांक ७
मूलांक ७ असलेल्या लोकांचा स्वभाव खूप विचारशील मानला जातो. हे लोक कोणतीही गोष्ट वरवर पाहून निर्णय घेत नाहीत, तर त्यामागचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. यांना एकटे बसून विचार करणे आणि स्वतःच्या अनुभवांचे विश्लेषण करणे आवडते. कोणतेही नवीन नाते किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी हे लोक अनेक मुद्द्यांवर सखोल विचार करतात.
या मूलांकाचे लोक इतरांचा सल्ला नक्की ऐकून घेतात, परंतु अंतिम निर्णय स्वतःच्या बुद्धीने आणि समजुतीने घेणेच पसंत करतात. जर भूतकाळात एखाद्या नात्यात वाईट अनुभव आला असेल, तर हे लोक सहजासहजी कोणाच्या जवळ जात नाहीत. अनेकांना यांच्या या स्वभावामागे भीती किंवा संकोच वाटू शकतो, पण वास्तविक पाहता त्यांना कोणतीही परिस्थिती समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ हवा असतो.
मूलांक ८
अंकशास्त्रामध्ये मूलांक ८ ला शिस्त, मेहनत आणि जबाबदारीचे प्रतीक मानले जाते. या मूलांकाचे लोक आयुष्यात कोणतेही काम घाईघाईने करणे अजिबात पसंत करत नाही. विशेषतः करिअर, आर्थिक बाबी आणि भविष्याशी संबंधित निर्णयांच्या बाबतीत ते अत्यंत गंभीर असतात. त्यांच्यासाठी केवळ एखादे काम सुरू करणे महत्त्वाचे नसते, तर त्याचे दूरगामी परिणाम समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.
या मूलांकाचे लोक कुणावरही डोळे बंद करून भरोसा ठेवत नाहीत. ते समोरच्या व्यक्तीचे वागणे आणि काम करण्याची पद्धत अतिशय सूक्ष्मपणे पाहतात. जर कोणी पूर्वी त्यांचा विश्वास मोडला असेल, तर त्या व्यक्तीला पुन्हा संधी देणे त्यांना अजिबात आवडत नाही. ते आपल्या जबाबदाऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देतात आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे-तोटा तपासून पाहतात.
मूलांक ८ च्या लोकांबद्दल असे मानले जाते की, त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा खूप मोठा संघर्ष करावा लागतो. असे असले तरी, ते कधीही खचून न जाता पूर्ण धैर्याने आपली मेहनत सुरू ठेवतात. घाईघाईने मिळवलेल्या यशापेक्षा त्यांना शाश्वत आणि स्थिर परिणाम आवडतात. म्हणूनच कोणत्याही नवीन संधीचा स्वीकार करण्यापूर्वी ते त्याविषयीची संपूर्ण माहिती गोळा करतात आणि मगच पुढे जाण्याचा निर्णय घेतात.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
