These Mulank Detect Bad People Fast : अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट मूलांकामध्ये भरपूर ऊर्जा असते, जी व्यक्तींचा स्वभाव आणि जीवनातील निर्णयांवर प्रभाव टाकते. अनेकांचा असा विश्वास आहे की, ज्या लोकांच्या जन्मतारखेची बेरीज म्हणजेच मूलांक ४, ८, आणि ९ असतो ते बलवान, दृढनिश्चयी आणि त्यांच्यात योग्य-अयोग्यतेची तीव्र जाणीव असते. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, या मूलांकामधे शक्तिशाली, संरक्षक ऊर्जा असते, जी काली देवीच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडलेली असते.
हे तिन्ही मूलांक (४, ८ आणि ९) अशा लोकांपासून किंवा ठिकाणांपासून पटकन दूर राहतात, जे त्यांच्या दृष्टीने हानिकारक किंवा नकारात्मक असतात. कारण – ते समोरच्याची ऊर्जा किंवा हेतू लवकर ओळखू शकतात. त्यामुळे ते जास्त विचार न करता अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतात. कारण – तज्ज्ञांच्या मते, ही मंडळी शक्ती मानसिक स्पष्टता आणि भावनिक सुरक्षिततेला प्राधान्य देतात.
स्वभाव
तुम्ही भरपूर निष्ठावान असतात. मित्र, कुटुंब आणि जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता. जेव्हा प्रियजनांचे रक्षण करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा योद्ध्यांप्रमाणे लढतात. तुमची अंतर्ज्ञानशक्ती प्रबळ असते. इतरांच्या मनात काय चालले आहे हे समजण्यात पारंगत असता. ही नैसर्गिक क्षमता तुम्हाला काय खरे आणि काय खोटे हे ओळखण्यास मदत करते, ज्यामुळे कठीण सामाजिक परिस्थितीतही तुम्ही सुरक्षित राहू शकतात. तुम्ही कोणालाही घाबरत नाही. समस्यांपासून पळून जाण्याऐवजी त्यांचा सामना करतात. तुमच्या अडचणींवर मात करण्याच्या क्षमतेला अनेक जण मोठी शक्ती मानतात, जी दृढनिश्चयाने कठीण प्रसंगांवर मात करण्यास मदत करते.
मूलांक आणि ग्रह प्रभाव
- मूलांक ४ अनेकदा वेगळ्या विचारसरणी, अनपेक्षित बदल, अनोख्या मार्गाशी जोडला जातो. अंकशास्त्रानुसार तो राहूच्या प्रभावाखाली असतो. त्यामुळे या मूलांकाच्या व्यक्तींमध्ये हटके विचार, धाडसी निर्णय घेण्याची प्रवृत्ती दिसून येते.
- मूलांक ८ शनीशी संबंधित मानला जातो. शनी न्याय, शिस्त, जबाबदारी, कर्माचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या मूलांकाच्या व्यक्ती मेहनती, संयमी आणि नियम पाळणाऱ्या स्वभावाच्या असू शकतात.
- मूलांक ९ मंगळाच्या अधिपत्याखाली येतो. मंगळ शौर्य, ऊर्जा, कृती, सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या मूलांकाच्या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण, धाडस आणि आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद दिसून येते.
