Nag Panchami 2024: हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी देशभरात नागदेवतेची पूजा केली जाते. यंदाची नागपंचमी काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या दिवशी अनेक शुभ योग निर्माण होत असून शुक्र-बुध आणि मंगळ-गुरूची युती निर्माण झाली आहे. सध्या सूर्य कर्क राशीत असून शनि कुंभ राशीत विराजमान आहे, जो शश राजयोग निर्माण करत आहे. शुक्र आणि बुध सिंह राशीत असून लक्ष्मी-नारायण राजयोग निर्माण करत आहेत. तसेच राहू मीन राशीत आणि केतू-चंद्र कन्या राशीत विराजमान आहेत. नागपंचमीच्या दिवशी सिद्ध योग, रवि योग आणि साध्य योगदेखील निर्माण होत आहे. 'या' तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील संकटं होणार दूर (Nag Panchami 2024) मेष नागपंचमीचा शुभ योग आणि ग्रहांची चाल मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ फळ देणारी ठरेल. या काळात तुम्हाला संपत्तीचे सुख मिळेल. आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. आयुष्यातील अडथळे सहज दूर कराल. प्रेमसंबंध मजबूत होतील. आकस्मिक धनलाभ होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळेल. कुटुंबातही सुख-शांती राहील. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. वृषभ नागपंचमीचा शुभ योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात मित्रांची साथ मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवी संधी मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात सुख-शांतीचे वातावरण असेल. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. हेही वाचा: पुढील चार महिने देवी लक्ष्मीची कृपा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि भौतिक सुख सिंह सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नागपंचमीचा शुभ योग खूप सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. करिअरमध्ये यश मिळवाल. या काळात तुमचे प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. दूरचे प्रवास घडण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल. समाजात मानसन्मान वाढेल. भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. धार्मिक कार्यात मन रमेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. (टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)