Chandra Gochar 2026 : नागपंचमीच्या (१७ ऑगस्ट २०२६) दिवशी चंद्र ग्रह कन्या राशीतून बाहेर पडून तुळ राशीत प्रवेश करेल. चंद्राचे हे भ्रमण सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी होणार आहे. या भ्रमणामुळे तुळ राशीसह कर्क आणि धनु राशीच्या लोकांनाही अत्यंत शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे. या राशींना नशिबाची भक्कम साथ मिळून आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. चंद्राच्या या भ्रमणाचा कर्क, तुळ आणि धनु राशीवर काय प्रभाव पडेल, हे सविस्तर पाहूया.
कर्क
चंद्राच्या या भ्रमण प्रक्रियेमुळे कर्क राशीच्या लोकांच्या कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील. जे लोक गेल्या अनेक दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते, त्यांना यश मिळण्याचे संकेत आहेत. या काळात जमीन, घर किंवा वाहनसुखाचा लाभ मिळू शकतो. नशिबाच्या साथीने तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. आई-वडिलांसह चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातूनही हे भ्रमण तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.
तुळ
चंद्र तुळ राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या मानसिक स्थितीत सकारात्मक आणि चांगले बदल दिसून येतील. विवाहित लोकांच्या वैवाहिक संबंधात गोडवा आणि सुधारणा पाहायला मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. कौटुंबिक आयुष्यात सुखाचे क्षण अनुभवता येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना नशिबाच्या बळावर यश मिळण्याची शक्यता आहे. प्रथम स्थानात चंद्र असल्याने तुमच्या क्रिएटिव्हिटीत वाढ होईल.
धनु
धनु राशीच्या लोकांना चंद्र गोचरामुळे नशिबाची पूर्ण साथ लाभेल. या काळात जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याचे योग आहेत. काहींना उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग उपलब्ध होऊ शकतात. ज्यांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा होता, त्यांचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. परदेशी कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवता येईल.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
