Rashi Bhavishya 17 August 2026 In Marathi : आज १७ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. उद्या रात्री ४ वाजून ५९ मिनिटांपर्यंत चित्रा नक्षत्र जागृत होईल आणि रात्री ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत शुभ योग जुळून येणार आहे. राहू काळ ९ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होईल ते ११ वाजून ०७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त १२ वाजून १८ मिनिटांपासून सुरु होईल ते १ वाजून ९ मिनिटांपर्यंत राहील. आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असणार आहे. तर तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असणार चला जाणून घेऊ.
आजचे पंचांग व राशिभविष्य, १७ ऑगस्ट २०२६ (Dainik Rashi Bhavishya 17 August 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याची नाहक चिंता कराल. मित्र परिवाराची उणीव जाणवेल. मनावर कसलाही ताण घेऊ नका. स्वच्छंदी विचार करावेत.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
नवनवीन गोष्टी वाचनात येतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. जोडीदाराविषयी मनात संभ्रमनिर्माण होईल. अपचनाचे विकार जाणवू शकतात. विवेकाने परिस्थिती हाताळावी.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. योग अथवा व्यायाम करण्यात आळस करू नका. नवीन विचार प्रेरणा देणारा असेल. प्रेमातील व्यक्तीसाठी उत्तम दिवस. आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
घरात कटू शब्द वापरू नका. शक्यतो घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. काही कामे लांबणीवर टाकली जाऊ शकतात. दिवस मध्यम फलदायी राहील. नसते साहस करायला जाऊ नका.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
परिवारातील सदस्यांच्या गरजा समजून घ्या. संमिश्र घटना जाणवतील. नोकरदार वर्गाला कामाचा ताण जाणवेल. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. ध्यानधारणा करावी.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
तरुणांनी बेफिकिरीने वागू नये. सामाजिक बांधीलकी जपावी. काही वेळेस सबुरीने वागणे फायद्याचे ठरेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. लाभाच्या संधीकडे लक्ष ठेवावे.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराकडून अपेक्षा राहतील. इतरांवर विसंबून राहू नका. कामाविषयी एक विशिष्ट धोरण ठरवा. भावंडांशी वादाचे प्रसंग टाळा.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
मनात एक अनामिक भीती राहील. परंतु फार काळजी करण्याचे कारण नाही. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाराने वागाल. एकांत हवाहवासा वाटेल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावाल. विरोधक नरमाईने घेतील. मनातील काळजी दूर सारावी लागेल. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत: प्रयत्नशील राहावे. मुलांच्या वागण्याची चिंता वाटेल.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
विचारतील कर्मठपणा बाजूला सारावा लागेल. घरात उगाचच चिडचिड करू नका. कोणाचीही नाराजी पत्करू नका. तुमच्या कामाची पावती मिळण्यास थोडा काळ लागेल. चिकाटी सोडून चालणार नाही.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
कामात स्थिरता ठेवावी. अधिक उत्साहाने कामे हाताळाल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. समोरील कामे प्राधान्याने करावीत. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
खाण्या-पिण्याच्या सवयी बाबत आग्रही राहाल. आवडते छंद जोपासावेत. नकारात्मक विचार टाळावेत. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. वरिष्ठांचे कामात सहकार्य मिळेल.
