Nitin Gadkari Kundali Predictions: नितीन गडकरींची मदत म्हणजे ‘हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला’ असे म्हणत ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी केंद्रीय मंत्र्यांची कुंडली उलगडली होती. आणि खरोखरच आजच्या लोकसभा निवडणूक निकालामध्ये नितीन गडकरींनी भाजपाचा गड राखून हा अंदाज खरा सिद्ध केला आहे. विदर्भातून महायुतीच्या केवळ एका उमेदवाराला आपली जागा राखून ठेवता आली आहे आणि ते म्हणजे नितीन गडकरी. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार नितीन गडकरी हे नागपुरातुन विजयी झाले आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गडकरींना ६ लाख ११ हजार ६२६ मते प्राप्त झाली होती. गडकरींच्या विरुद्ध असणाऱ्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे विकास ठाकरे होते ज्यांना ४ लाख ७२ हजार ६२० मते आहेत. तब्बल १ लाख २८ हजार २९६ मतांच्या फरकाने गडकरींनी बाजी मारली आहे. गडकरींच्या या विजयामुळे येत्या काळात केंद्रातील त्यांचे स्थान आणखी भक्कम होण्याची चिन्हे आहेत. गडकरींच्या कुंडलीवरून ज्योतिषी उल्हास गुप्ते यांनी घेतलेला भविष्यवेध पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन गडकरींचे भविष्यवेध

गुप्ते यांनी म्हटल्याप्रमाणे, २ मार्च २०२६ पर्यंत गडकरींच्या कुंडलीत बुधाची अंतर्दशा व २०३५ पर्यंत कायम गुरु महादशा आपल्याला राजकीय क्षेत्रात बहुमानाचे पद प्राप्त करून देईल. जुलै २०२४ पर्यंत अष्टमेश चतुर्थात व गुरु षष्ठात, लग्नात शुक्र असल्याने तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. श्रम करणे टाळावे. मानसिक स्वास्थ्य जपावे. बुध मंगळ त्रिएकादश योगातून तयार होणारा राजयोग पुढील काळातही उत्तम नेतृत्व निर्माण करेल. तसेच अडचणीच्या काळात आपल्या चतुरस्त्र डावांनी देशातील लोकशाहीला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारून होणारा विरोध संपवून टाकेल. आश्वासने नकोत, पूर्तता करू हा त्यांचा कानमंत्र ठरेल. राजकीय आयुष्यात पुरेसे पर्याय असावेत हे ही लक्षात ठेवायला हवे.

हे ही वाचा<< “२०२७ पर्यंत पुन्हा..”, उद्धव ठाकरेंसाठी मोठी भविष्यवाणी; कुंडलीतील बदलाचं लोकसभेच्या निकालातील प्रतिबिंब पाहा

लोकसभा निवडणूक निकालाची यंदाची आकडेवारी पाहता, भाजपाला ४०० तर लांबच पण ३०० चा टप्पाही गाठता आलेला नाही. एनडीएला म्हणजे भाजपा व घटक पक्षांना मिळूनही फक्त २९५ जागी आघाडी घेण्यात यश आले आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान या चार राज्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात तर पाच केंद्रीय मंत्र्यांपैकी तीन जण हे पराभवाच्या छायेत दिसत आहेत. स्वतः मोदी सुद्धा अवघ्या दीड लाखाच्या मताधिक्यानेच विजयी झाले आहेत. अशा एकूण स्थितीत यंदा भाजपा विजयी जरी होणार असेल तरी हा विजय फार आनंद घेऊन येईल असे दिसत नाही. अशावेळी उद्या नितीन गडकरींचे महत्त्व आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, यासाठी त्यांच्या कामाशिवाय नशिबाची सुद्धा साथ मिळेल असे सध्याचे अंदाज आहेत.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur results nitin gadkari major win can change prime minister power game as kundali predicts big role till 2026 loksabha results update svs