scorecardresearch

Premium

Name Astrology : ‘A’अक्षरापासून नाव असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो? नावाचे पहिले अक्षर सांगते व्यक्तिमत्त्व

आज आपण‘A’अक्षरापासून नाव असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत.

name astrology nature of people whose name starts with A
(Photo : freepik)

ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर व्यक्तीचा स्वभाव सांगतो. व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर त्या व्यक्तीचे गुण, स्वभाव आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगतात, असे मानले जाते. आज आपण‘A’अक्षरापासून नाव असलेल्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत.

ज्योतिषशास्त्रानुसार ‘A’अक्षरापासून नाव असणाऱ्या लोकांवर सूर्यदेवतेची विशेष कृपा असते. ज्योतिषशास्त्रानुसार A’अक्षरापासून नाव असलेल्या लोकांची रास मेष असते आणि मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असतो. हे लोक खूप बुद्धिमान आणि मेहनती असतात आणि ते सहसा लवकर अपयशी होत नाही. असे मानले जाते.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

हेही वाचा :या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती असतात भाग्यवान? समाजात मिळतो विशेष आदर-सन्मान!

ज्योतिषशास्त्रानुसार ‘A’ अक्षराची लोक खूप आत्मविश्वासू आणि धैर्यवान असतात आणि ते कोणावर अवलंबून राहत नाही. असे म्हणतात की या लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. ते नेहमी आनंदी असतात आणि आपल्या सर्व इच्छा पुर्ण करतात, असे मानले जाते. असं म्हणतात की या लोकांचे अनेक मित्र असतात आणि हे लोक मनापासून मैत्री निभवतात.

हेही वाचा : या राशींचे लोक असतात बेस्ट बाबा ? मुलांसाठी असतात आदर्श

‘A’ अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या लोकांमध्ये लीडरशिप क्वालिटी असते. त्यामुळे हे खूप चांगले टीम लीडर होतात, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक रोमँटीक नसतात आणि या लोकांना सिरीअस रिलेशनशिपमध्ये राहायला आवडते. असं म्हणतात की या लोकांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा पार्टनर आवडत नाही. यामुळे या लोकांना रिलेशनशिपमध्ये अडचणी येतात

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 10:57 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×